‘आयएमए कोरेगाव’ला उत्कृष्ट शाखा पुरस्कार

सोलापुरात राज्यस्तरीय परिषदेत गौरव


स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेतर्फे सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरेगाव शाखेला सर्वोत्कृष्ट शाखा (बेस्ट अवॉर्ड) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे कोरेगाव शाखेच्या अध्यक्ष डॉ. संगीता रणजितसिंह सावंत, सचिव डॉ. शीतल राजेंद्र गोसावी व शाखा पदाधिकार्‍यांचे अभिनंदन होत आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन ही संस्था एमबीबीएस डॉक्टरांसाठी कार्य करत असते. महाराष्ट्रात त्यांचे एक लाखाच्यावर सभासद असून, नुकतीच त्यांची सोलापूर येथे राज्य पातळीवरील परिषद झाली. या परिषदेत राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी कोरेगाव शाखेच्या अध्यक्ष डॉ. संगीता सावंत व सचिव डॉ. शीतल गोसावी यांना उत्कृष्ट शाखेसाठीचा पुरस्कार देऊन गौरव केला.
कोरेगाव शाखेने आजवर समाजाच्या हितार्थ राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात आला आहे. शाखेने चांदवडी येथे वृक्ष संवर्धन केले असून, संजीवन विद्येचा डॉ. संगीता सावंत डॉ. शीतल गोसावी प्रचार प्रसार करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, तसेच महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रुग्ण, डॉक्टर व शासन यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
कोरेगाव शाखेच्या वतीने आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शाखेने कोरेगाव शाखेचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार देऊन गौरवल्यामुळे कोरेगाव शाखेची मान राज्यभर उंचावली आहे. शाखेच्या विविध उपक्रमांत शाखेचे सभासद, कोरेगावकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्याने आम्हाला हा पुरस्कार मिळाला असून, हा पुरस्कार आम्ही कोरेगावच्या समस्त नागरिकांना नम्रपणे अर्पण करत आहोत, अशी प्रतिक्रिया डॉ. सावंत, डॉ. गोसावी यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!