स्थैर्य, सोलापूर, दि. 27 : शहरातील नॉन कोविड रुग्णालयांची यादी आणि रुग्णालयाचे हेल्पलाइन क्रमांक इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्याकडून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर करण्यात आले.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आयएमएच्या प्रतिनिधींना सूचना केल्या होत्या. सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालय व दवाखाने सुरू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयएमएकडून शहरातील रुग्णालयांची यादी व हेल्पलाइन क्रमांक जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरीश रायचूर आणि सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुदीप सारडा यांनी यादी सादर केली आहे.
हॉस्पिटलची नावे आणि हेल्पलाईन क्रमांक
सर्व स्पेशालिटी : अश्विनी हॉस्पिटल- 0217-2319900/5, संपर्क व्यक्ती : 9552555041, मार्कंडेय सहकारी रुग्णालय – 02172452018, यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल – 02172323001/2
अस्थिरोगतज्ञ : कोठाडिया नर्सिंग होम – 9689999711, शाश्वत हॉस्पिटल- 0217-2727057/ 8551887057, येमुल ऑर्थोपेडिक सेंटर – 9172836652 / 3550006, मोनार्क हॉस्पिटल – 7721800018,
न्यूरोलॉजी : एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स- 9823714872 / 9175988840, सी एन एस हॉस्पिटल- 02172728877 / 9322088000
बालरोगतज्ञ : स्पेन हॉस्पिटल – 02172728033, चिरायू मुलांचे हॉस्पिटल – 02172620800, शाश्वत हॉस्पिटल – 02172727057 / 8551887057
जनरल सर्जरी : मोनार्क हॉस्पिटल – 7721800018,
स्त्रीरोगतज्ञ : डॉ. रुंदा चौधरी- 9849633578/ 9423869563.