फलटण शहरात गुटख्याची अवैध वाहतूक; एकास अटक


दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
फलटण शहरात गुटख्याची अवैध वाहतूक करणार्‍या एकास पोलिसांनी रंगेहाथ पकडून गुटखा व मोटरसायकल असा मिळून १ लाख २१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तौसीफ उर्फ छोटू अब्दुल शेख (राहणार गजानन चौक, फलटण) हा फलटण शहरात अवैध प्रतिबंधित गुटखा मोटारसायकलवरून घेऊन जाणार असल्याची माहिती फलटण शहर पोलिसांना समजताच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या जवळील पांढर्‍या रंगाच्या पिशवीमध्ये काय आहे, हे पाहिले असता प्रतिबंधित अवैध गुटखा मिळून आला. पोलिसांनी मोटरसायकल व गुटखा असा एकूण १ लाख २१ हजार ८४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये अन्नसुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे यांनी दिली असून पुढील तपास सपोनि केणेकर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!