इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे शनिवारी आयोजन


स्थैर्य, 25 फेब्रुवारी, सातारा : राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे व उपक्रम याबाबत भागधारकांसोबत जागरुकता वाढविण्यासाठी तसेच या

संदर्भातील सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याअध्यक्षतेखाली दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते 4 वा. या वेळेत सदर बझार सातारा येथील केबीपी अभियांत्रिकी महाविद्यालयात Ignite Maharashtra -2026 अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ. सु. दंडगव्हाळ यांनी दिली.

या कार्यशाळेत जिल्हा अग्रणी व्यवस्थापक, कस्टम विभाग, पोस्ट ऑफीस इंडीया पोस्ट, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, आयडिबीआय कॅपिटल मार्केट व इतर वित्तीय संस्थाचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकार्‍यांचे आयात व निर्यात क्षेत्रातील अनुभवी प्रवक्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, उ. सु. दंडगव्हाळ यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सातारा, MIDC वसाहत फुलोरा हॉटेल जवळ, जुनी एमआयडीसी, सातारा, जि. सातारा दुरध्वनी क्रमांक 02562-244655, ई-मेल आयडी didic.sataramaharashtra.gov.in येथे संपर्क करण्यात यावा.


Back to top button
Don`t copy text!