स्थैर्य, मुंबई, दि. ०३ : टीसीएलची सहाय्यक कंपनी आयफाल्कनने ४के युएचडी के७१ आणि क्यूएलईडी एच७१ स्मार्ट टीव्हीची श्रेणी अॅमेझॉन डॉटईनवर लॉन्च केली आहे. आयफॉल्कनच्या उत्कृष्ट सेवा उत्साहवर्धक किंमतीत मिळण्यासाठी आता ग्राहकांना आणखी एक केंद्र उपलब्ध झाले आहे. अत्याधुनिक स्मार्ट उत्पादनांसह देशभरातील ऑनलाइन अस्तित्व विस्तारण्याचे ब्रँडचे उद्दिष्ट असून याची सुरुवात ४के युएचडी के७१ आणि क्यूएलईडी एच७१ या अनुक्रमे २६,९९९ रुपये आणि ४९,९९९ रुपयांपासून सुरु होणाऱ्या स्मार्ट उत्पादनांसह करण्यात येत आहे.
के७१ ४के युएचडी अँड्रॉइड टीव्ही आकर्षक डिस्प्ले फीचर्ससह येतो. यात डॉल्बी व्हिजन, ४के अपस्केलिंग आणि पाहण्याचा अप्रतिम अनुभव मिळण्यासाठी वर्धित रंगसंगती दिसतके. लिव्हिंग रुममध्ये उच्च प्रतीच्या नैसर्गिक आवाजाचा अनुभव मिळण्यासाठी हा डॉल्बी ऑडिओलाही सपोर्ट करतो. यामुळे ग्राहकांना आणखी वेगळ्या प्रकारचे मनोरंजन मिळेल. ४३ इंच, ५५ इंच आणि ६५ इंच प्रकारात उपलब्ध असलेले हे मॉडेल अनुक्रमे २६,९९९ रुपये, ३६,९९९ रुपये आणि ५२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.
एच७१ ४के क्यूएलईडी अँड्रॉइड टीव्हीमध्ये के७१ मध्ये असलेल्या सर्व सुविधा आहेत. याशिवाय यात एचडीआर १०+, क्वांटम डॉट टेक्नोलॉजी आणि पाहण्याच्या व ऐकण्याच्या उत्कृष्ट आवाजासाठी डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस-एचडी साउंड टेक्नोलॉजी आणि आयपीक्यू इंजिन तंत्रज्ञान यात आहे. ५५ इंच आणि ६५ इंच प्रकारात उपलब्ध असलेले अनुक्रमे ४९,९९९ आणि ८३,९९९ रुपयांत उपलब्ध आहेत.
टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक चेन म्हणाले, “अॅमेझॉनसारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. तसेच याद्वारे आम्ही ग्राहकांना आमची उत्पादने किफायतशीर किंमतीत नव्या टचपॉइंटवर उपलब्ध करून देत आहोत. या भागीदारीमुळे देशभरात आमची पोहोच वाढेल आणि आम्ही जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू. आमची उत्कृष्ट उत्पादने आणि वेगळ्या पातळीवरील मनोरंजन हे दोन्ही उत्साहवर्धक आणि भरभराट देणारे आहे. अॅमेझॉन डॉटइनवर आम्ही लवकरच आणखी उत्पादने लाँच करू आणि ग्राहकांना आमची उत्पादने खरेदी करण्याचे नवे कारण मिळवून देवू.”