स्थैर्य, फलटण : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तिरंगा कॉलेज ऑफ ऍनिमेशन अँड व्ही.एफ.एक्स, बारामती येथे ऍनिमेशन क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी बारावीच्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी काही महत्वाच्या करिअरच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धात्मक युगात आपण कोणते कार्यक्षेत्र निवडावे. या काळात शिक्षणाच्या विविध संधी एका वेगळ्या करियर साठी तयार केल्या आहेत ह्या संधी आपण अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकाकडुन समजून घेणे गरजेचे आहे.
सृजन आणि कल्पक तरुणांना, त्यांच्या व्यक्तिगत जीवनकार्यचे आव्हानं सहज पेलण्यासाठी व व्यक्तिगत जीवनकार्य यशस्वीपणे जगण्यासाठी आवश्यक असे महत्वाचे गुण विकसित करण्याचे कौशल्य आत्मसात करणे,तसेच जीवनात काय करावे की या जगात आपले स्वतःचे प्रभुत्व सिध्द करु शकू त्याचे कौशल्य आत्मसात कसे करणे व आपली छाप कशी निर्माण करावी यासाठी व जीवनकार्य यशस्वीपणे जगण्यासाठीच्या शिक्षणात म्हणजेच तिरंगा कॉलेज तर्फे ॲनिमेशन आणि फिल्म क्षेत्रातील शिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम तिरंगा कॉलेज निरंतर करत आहे. त्यामुळे ऍनिमेशन क्षेत्रात उद्योजकता विकासाची कास धरून नौकरी व उद्योजकता वाढवण्याची काळाची गरज पूर्ण करत आहे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऍनिमेशन हे करियर करण्यासाठी मार्ग दर्शविला आहे.
तिरंगा कॉलेज, सध्या विविध प्रोजेक्ट्स वरती देशपातळीवर कार्यरत आहे व देशातील तरुण व तरुणी यांना अनिमेशन कलाकारांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरती नवीन संधी उपलब्ध करून देत आहेत. ऍनिमेशन उद्योग कंपन्या मध्ये जे आधुनीक तंत्राचा वापर केला जातो त्याचे प्रायोगिक शिक्षण, तिरंगाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात आत्मसात करीत आहेत ही बाब वाखाण्याजोगी असून ती बाब भावी कलाकार निर्मितीच्या साठी आशादायक आहे. हे लक्ष्यात घेणे आवश्यक आहे. अनिमेशन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामवंत कंपन्या बरोबर रोजगार / नौकरी उपलब्धतेचे करार तिरंगा कॉलेजने केलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज 100% नोकरीची हमी देत.
या क्षेत्रात सतत अग्रेसर राहण्यासाठी व भारताचे नेतृत्व याही क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरती अभाधित राहण्यासाठी कॉलेजच्या मॅनेजमेंट ने “ ट्रायपिक्सल अनिमेशन स्टुडीओ” ची ही स्थापना केली आहे. या स्टुडीओच्या माध्यमातून अनिमेशन क्षेत्रातील तरुण व तरुणी साठी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न स्तुती पात्र आहे. ह्या स्टुडिओ च्या माध्यमातून काही नामांकित चित्रपटावर काम केले आहे. जसे की पानिपत व तानाजी. आजची तरुण व तरुणी ज्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत व त्यांना बेकारीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यासाठी कौश्यल प्रधान शिक्षण देण्यासाठी तिरंगा कॉलेज कार्य करीत आहे. नीती व व्यवहारिक मुल्यांचा आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणत ऱ्हास होत आहे. व त्यांची जोपासना करणे हे आज जबाबदारीचे झाले आहे. त्यासाठी, त्यांना माणूस म्हणून घडविणे हे तिरंगा कॉलेजची प्राथमिक उदिष्ट आहे.
उद्योजकतेचा विकास प्रामुख्याने खेड्यातील मुलांमध्ये होणे हे गरजेचे आहे व त्यासाठी तिरंगा व “ट्रायपिक्सल” हे सरकारमान्य व एनजीओ च्या साह्याने वेगवेगळ्या कार्यशाळेची योजना करितात व उत्तम कार्यक्रम घेत असतात. तिरंगा कॉलेज हे सामाजिक जाणिवांची संवेदनशिल असलेले एक उत्तम असे कॉलेज आहे . तिरंगा कॉलेज ऍनिमेशन अँड व्हीएफएक्स ही डिजिटल मीडिया क्षेत्रातील शैक्षणिक संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित आहे. संस्था एक स्वायत्त महाविद्यालय म्हणून कार्यरत आहे. आणि ऍनिमेशन आणि मीडिया अभ्यासक्रमांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी संबंधित आहे. तिरंगा महाविद्यालयाला गुणवत्तेच्या व्यवस्थापनासाठी ZASANZ तर्फे ‘आयएसओ 9001-20015 प्रमाणपत्र’ प्रमाणपत्र दिले गेले आहे. 2019-20 साठी भारतातील नामांकित असलेले पारितोषिक “सिग्नेचर ब्रँड अवॉर्ड 19-20” तर्फे तिरंगा कॉलेज करिता महाराष्ट्रातील अग्रगण्य कॉलेज म्हणून पारितोषिक मिळाले आहे. याचबरोबर मागील वर्षी तिरंगा कॉलेजने पारितोषिके पटकावली आहेत.
पुणे जिल्ह्यातील बारामती शहराच्या मध्यस्थानी चोवीस एकर मध्ये पसरलेले हे कॉलेज आहे. आम्ही नामांकित ऍनिमेशन स्टुडिओमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट देऊन मुलांना फक्त पुस्तकी ज्ञाना व्यतिरिक्त व्यवहारिक ज्ञान आणि इंग्रजीमध्ये शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करतो. तिरंगा कॉलेजचे प्लेसमेंट सेल सदैव कार्यरत असते. आपण १२ वी असाल व आपल्याला जीवनात योग्य दिशेने वाटचाल करायची असेल तर अवश्य भेट द्या. सोमवार ते शनिवार कॉलेज सकाळी 9.00 ते 6.30 या वेळेत चालू असेल. अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट http://tirangaeducation.com/ आहे. त्या सोबतच 7720818111 या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.