भक्तीकडे लक्ष दिले तर, संसाराची बाधा होत नाही – ह.भ.प.श्यामबुवा घुमकेकर.


सज्जनगड – येथील समर्थ सेवा मंडळाच्या भक्तनिवासात सुश्राव्य कीर्तन सादर करताना नागपूर येथील ह.भ.प.शाम बुवा घुमकेकर. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, 3 जानेवारी, सातारा : भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा .. संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर अतिशय सोश्राव्य असे किर्तन सादर करत नागपूर येथील ह.भ.प.श्यामबुवा घुमकेकर यांनी सज्जनगड येथील उपस्थित समर्थ भक्तांना अक्षरशः दोन तासाची सुश्राव्य अशी कीर्तनाची पर्वणीच मिळवून दिली. संत एकनाथ महाराजांच्या भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा.. या अभंगावर अतिशय सुरेख निरपण करताना पवनपुत्र हनुमान आणि भक्ती कशी केली याचे आख्यान लावत अतिशय सुरेख आणि चपखल अशी संसारीक भक्तांना पचतील अशी उदाहरणे देत आपले आख्यान रंगवले .श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’ यांच्याव्दारे आयोजित ’दासनवमी उत्सव’ कालावधीत नागपूर येथील ह.भ.प.श्यामबुवा घुमकेकर यांनी कीर्तन रंगवले .

आता तरी करी सार्थक काही मानव देह पुन्हा नाही.. हे शिवदिन केसरी महाराज, पैठण यांचे पद सांगताना जीवनाचे सार्थक कशात आहे .याचे सुरेखपणे विवेचन त्यांनी केले .धन, कांता, ममत्व यात लक्ष न घालता भक्ती कडे लक्ष दिले तरी संसाराच्या बाधा होत नाहीत. हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंगातील रूपक ..जववरी रे तोवरी, जंबुक करी गर्जना.. जोवर पंचांनन ने देखीले नाही.. यावर स्पष्टीकरण करताना जोपर्यंत बेडूक हा नागाकडून पाहिला जात नाही ,तोवर तो गर्जना करत असल्याचे उदाहरण देताना ..जववरी रे तलवारी बाधी, हा संसार ..जववरी रे रखुमादेवीवर देखीले नाही ..म्हणजेच जोपर्यंत तुम्ही विठ्ठल रुक्मिणी हा आपल्या सर्वांचा बाप पाहत नाही .तोपर्यंत तुम्हाला संसाराची बाधाही होणारच .अशी सुरेख उदाहरणे आपल्या कीर्तनातून दिली

शामबुवा घुमकेकर यांना कीर्तन कार्यक्रमात सुशील गद्रे यांनी ऑर्गनवर साथ केली ,तर तबला साथ अभिनव जोशी यांनी केली .या सर्व कलाकारांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार व सज्जनगड मासिकाचे संपादक डॉ.अजित कुलकर्णी यांनी शाल श्रीफळ व समर्थ प्रसाद देऊन केला .यावेळी दासनवमी उत्सवासाठी संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशातून उपस्थित असलेल्या समर्थ भक्तांची मोठी उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी केले.

दि.4 फेब्रुवारीला प्रा.डॉ. अजित कुलकर्णी यांचे प्रवचन होणार आहे,दि.4 फेब्रुवारी रोजी अभयसिंह वाघचौरे यांचे गायन होणार असून त्यांना तबला साथ राघव नरेवाडीकर तर संवादिनीवर साथ स्वानंद राजपाध्ये करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!