दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | सातारा | कोणीही यावे आणि भर रस्त्यात कशीही गाडी लावून जावे हे आता चालणार नाही. सातारा शहरातील वाहतूक शाखेचे कर्मचारी तितकेच तत्पर असून सर्वात सक्षम आणि तत्परतेने कार्य करणाऱ्या य या शाखेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे शुक्रवारी दुपारी मोती चौकातून शनिवार पेठेतील सदैव गजबजलेल्या भर रस्त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एक खाजगी पांढऱ्या रंगाची गाडी अशा पद्धतीने भर रस्त्यात पार्क करण्यात आली वाहतूक शाखेच्या क्रेन वरून फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या गाडीला जामर तर लावलाच आणि दंड भरून जामर काढण्यासाठी रविवार पेठ पोवई नाका येथील शाखेत संपर्क साधा.
असे या वाहनाच्या काचांवर लिहून खऱ्या अर्थाने कारचालकाला सज्जत दमच भरला वस्तुतः वाहन मालक तसेच चालकांनीही आपण एखाद्या संस्थांचे राजे असल्यासारखे भासवत कोणीही यावे आणि कोठेही गाडी लावून जावे हे आता चालणार नाही हेच या घटनेतून दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी आपण जी काही नियम बंधने पाळायला हवीत त्याकडे अगदी सराईतपणे काना डोळा करत रस्ता काही आमच्या मालकीचा अशा अविर्भावात लावलेल्या या वाहन चालकाला मात्र खऱ्या अर्थाने वाहतूक शाखेच्या सातारच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली ही पोचपावती अगदी बरोबरच आहे .त्यामुळे साताऱ्यात याल आणि नियम टाळाल तर दंडाला पात्र ठराल असेच म्हणण्याची वेळ आली आहे.