दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सहा सहा वर्ष एका पोलिस ठाण्यात कर्मचारी ठेवण्याचे कारण काय? महिना झाला गुन्हा दाखल होऊन तरी तुम्हांला गुंड सापडत नाही. काय काम करता तुम्ही आणि तुमचे कर्मचारी असा प्रश्न गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी उपस्थित करुन नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्या तपासात हलगर्जीपणा केल्याने तुमच्यावर कारवाई करु असा जणू इशाराच दिला आह
खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपुर्वी सातारा पोलिस आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नगरसेवक विनोद (बाळू) खंदारे याच्यावर दाखल असलेले गुन्हे, पोलिस प्रशासन राजकीय दबावापोटी करीत असलेले कामकाज या विषयी उदयनराजेंनी पत्रकार परिषदेतून पोलिस दलाच्या कामकाजाविषयी शंका व्यक्त केली होती. दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी बहुधा उदयनराजेंनी मांडलेल्या शंकेची शहनिशा करण्यासाठी आज पोलिस ठाणे गाठले.
आज (सोमवार) सकाळी अचनाक गृहराज्यमंत्री देसाई दुचाकीवरुन सातारा शहर पोलिस ठाण्यात गेले. तेथे जाताच तेथील वातावरण पाहून देसाई यांनी शिस्त आणि कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. दरम्यान मंत्री देसाई यांनी नगरसेवक विनोद उर्फ बाळू खंदारे याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मागितली असता नियुक्त कर्मचा-यास व्यवस्थित सांगता न आल्याने देसाईंनी अधिकार्यांना फैलावर घेतले.
देसाई म्हणाले खंदारेवर गुन्हा दाखल असल्याचे माहिती नाही. एका पोलिस ठाण्यात सहा वर्ष राहून देखील रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती देऊ शकत नाही कर्मचारी. अधिकारी सांगतात 18 गुन्हे पोलिस कर्मचारी सांगतात 12 गुन्हे, सहा गुन्हे लपविण्याचे कारण काय असे देसाई यांनी म्हणताच अधिकारी यांनी संबंधित विषय सावरुन घेत ते सहा गुन्हे प्रतिबंधात्मक विषयाचे असल्याचे सांगितले.