दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । महाबळेश्वरच्या पीडित युवतीच्या अत्याचार प्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून पुरावे द्यावेत आणि मग कोणाला सहआरोपी करायचे याची भाषा करावी . गुन्हा मुलांनी केल्यावर शिक्षा वडिलांना देण्याचे कोणत्या कायद्यात बसते त्यामुळे वाघ यांनी आमच्यावर आरोप करण्यापूर्वी ते सिध्द करावे नाही तर ते आरोप तत्काळ मागे घ्यावेत असा सणसणीत समाचार विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत घेतला .पीडित युवतीसह तिच्या कुटुंबियांचे सुरक्षित पुनर्वसन करण्यायी त्यांनी मागणी केली .
भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महाबळेश्वर चे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बावळेकर यांना महाबळेश्वर युवती अत्याचार प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी साताऱ्यात केली होती तसेच पोलीस यंत्रणा महा विकास आघाडीच्या दावणीला बांधल्याचा आरोप केला होता या विधानांचा समाचार नीलम गोरे यांनी साताऱ्यात सोमवारी पत्रकार परिषदेत घेतला . येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यावेळी उपस्थित होते .
विधान परिषद उपसभापती नीलम गोरे म्हणाल्या की, महाबळेश्वर येथील अत्याचार पीडित कुटुंबास मी भेटले आहे. याबाबत जी घटना घडली त्याचा तपशील समजून घेतला आहे.ज्या सोसायटीत त्या रहात असतात त्यानुसार तिथे गेल्यानंतर आज मला त्या मुलीला कोणताही त्रास नसल्याचे सांगितले त्याशिवाय मुलीच्या व कुटुंबियांच्या सुरक्षेसह त्यांचे मनोधैर्य अथवा इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची सूचना केली आहे .
महाबळेश्वर प्रकरणात पोलीसानी त्याबाबत आरोपीस जेरबंद केलं आहे. पण गुन्हा दाखल होण्यापूर्वी पीडित मुलीस दिवस गेले होते की काय याबाबत कोणीही तिची चौकशी संबधितांनी केली नव्हती हीच गोष्ट अमानवी आहे
डीएनए अहवालानंतर पुढील कार्यवाही होईलच. मात्र चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना गोरे म्हणाल्या त्यांचेकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात द्यावेत उगाच हवेत बाण मारू नयेत . कोणत्याही प्रकरणात विरोधी पक्ष बोलू शकतो पण त्यांनी साधार बोलावे ,वाईच्या महिला उपविभागीय अधिकारी उत्तम तपास करत आहेत . कोण कोणाच्या दावणीला बांधलेले नाही , दावणीतून सुटलेलेच यांना भेटले असतील त्यामुळे दावणचं मजबूत करू असा टोला त्यांनी लगाविला . या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईलच पण मुलांची शिक्षा वडिलांना द्यायची हा कोणता न्याय ? वस्तुनिष्ठ चौकशी होईल व डीएनए चाचणीनंतरच चार्जशीट दाखल होईल त्यामुळे आरोप करणाऱ्यांनी आरोप प्रतिज्ञापत्र देऊन कोर्टात सिध्द करावे अन्यथा ते मागे घ्यावेत असे गोरे यांनी सुनावले .
हिंसाचार गुन्ह्यांचा दर 0.5 ने कमी झाला असेल पण ते कदाचित करोनामुळे आरोपींना बाहेर पडता आले नसावे, म्हणून असावे.