कोरोना काळात कसलीही अडचण असल्यास दुरध्वनी द्वारे संपर्क साधा; श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे आवाहन


स्थैर्य, फलटण, दि. १९ : सध्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोरोना या साथ रोग आजाराचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. तरी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील कोणत्याही नागरिकांना कसलीही अडचण अथवा काहीही काम असले तरी नागरिकांनी दुरध्वनी द्वारे संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकांचे कोरोना बाबत, आरोग्य विषयक, व्यक्तिगत, शैक्षणिक, सामाजिक अथवा इतर कोणतेही काम असले तरी नागरिकांनी दुरध्वनी द्वारे संपर्क साधावा. सध्या फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरोनाची परिस्थिती पाहता आपण सर्व जणांनी एकमेकांशी न भेटलेले योग्य ठरणार आहे. कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर त्याची सुरवात ही आपण स्वतः पासुन केली पाहिजे म्हणूनच नागरिकांचे कोणतेही काम असले तरी त्यांनी दुरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे ही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

जगन्नाथ उर्फ भाऊ कापसे – 9850730123, महादेव माने – 9422496446, तुषार नाईक निंबाळकर – 9822883006 या दुरध्वनी द्वारे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधता येईल.


Back to top button
Don`t copy text!