दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा एमआययडीसी पश्चिम महाराष्ट्रातील गोल्डन ट्रँगल मधील उत्कृष्ट एमआयडीसी आहे मात्र 47 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या औद्योगिक वसाहतीला मंदीचे ग्रहण लागले आहे यामध्ये कामगार चळवळीत कोणाची एकाधिकारशाही फोफावली आहे हे सर्वांना ठाऊक आहे. पंडित पंडित ऑटोमोटिव्ह बेकायदेशीर लिलाव देणाऱ्या व घेणाऱ्यांना कामगार उध्वस्त करायचा आहे काय ? कामगार चळवळ चिरडाल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे, असा अल्टिमेटम देत लोकप्रतिनिधी असाल म्हणून टाळु वरचे लोणी खाणार काय ?असा जळजळीत सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.
साताऱ्यात पंडित ऑटोमोटिव्हच्या पाचशेहून अधिक कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सध्या गाजतो आहे. या कंपनीच्या जागेचा लिलाव आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने खा. उदयनराजे भोसले यांनी या वादात उडी घेत कामगार चळवळ चिरडाल तर खबरदार गाठ माझ्याशी आहे, असा अल्टिमेटम त्यांनी दिला . येथील शासकीय विश्रामगृहाच्या दर्शनी भागात सर्व कामगारांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपला संताप व्यक्त केला . जी जागा तब्बल 42 कोटी रुपयांची आहे त्या जागेचा लिलाव संबंधितांनी फक्त आठ कोटी मध्ये घेतला आहे म्हणजे एमआयडीसीचे अधिकारी संबंधित बँक व लिलाव घेणाऱ्यांचे संग संगनमत स्पष्ट दिसून येत आहे.
एमआयडीसीच्या प्रश्नावर मी बोलणार म्हणजे तुम्ही षड्यंत्राचा आरोप करणार मात्र मी पोटतिडकीने बोलतो यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही . 1974 साली सातारा एमआयडीसी ची स्थापना झाली गेल्या 47 वर्षांत या एमआयडीसीत कोणाची एकाधिकारशाही फोफावली हे उघड सत्य आहे .आम्ही बोलायला गेलो तर आमच्यावर खंडणीचे गुन्हे टाकायचे .पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीच्या कामगारांना आणि त्यांच्या अस्तित्वाला कोणी चिरडू शकत नाही तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत म्हणून टाळूवरचे लोणी खायचा अधिकार मिळाला काय कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाच नाही त्यांच्या वेदना समजून घ्यायला हृदय लागतं आणि ते संबंधितांकडे नाही असा आरोप उदयनराजे यांनी केला . एमआयडीसी वाढवावी उद्योग वाढावे याचे कोणालाच काही पडले नाही माझ्या अकाउंट वर किती पैसा आला यातच सगळ्यांना स्वारस्य आहे.
उदयनराजे भोसले यांनी कामगार आयुक्त एमआयडीसी अधिकारी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना हात जोडून विनंती केली की त्यांनी या प्रश्नात शासकीय यंत्रणा म्हणून लक्ष घालावे आणि सखोल चौकशी करावी येत्या 11 फेब्रुवारी रोजी मी साताऱ्यात परतल्यानंतर सातारा एमआयडीसीतील आजारी उद्योग किती आहेत आणि आठ कोटीत लिलाव देणाऱ्या बँकेला आम्ही सोळा कोटीचे ग्राहक देतो ती जागा कोणाला हस्तांतरित करू नये तसेच कामगारांच्या वकिलांनी या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी करावी अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या .मी संपूर्णपणे कामगारांच्या बाजूने असून त्यांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी भूमिकाही त्यांनी मांडली उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेचे कामगारांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.