दारूची दुकाने उघडायला परवानगी देताय तर मंदिरे उघडायला काय प्रॉब्लेम – देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


  

स्थर्य, सातारा, दि. २९ : दारुच दुकान उघडताय, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडताय आशा परिस्थितीत मंदिर उघडणे आग्रह असेल तर तो योग्य आहे. दारूची दुकाने उघडायला परवानगी देताय तर मंदिरे उघडायला काय प्रॉब्लेम असा रोकडा सवाल करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. 

दरम्यान, त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णांची आस्थेने चौकशी केली. जिल्ह्याला दिलेल्या इंजेक्शनच्या चोरीबाबत ही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विचारणा केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक धनंजय जांभळे, शहराध्यक्ष विकास गोसावी, विजय काटवटे, राहुल शिवनामे, ऍड.प्रशांत खामकर, अमित कुलकर्णी, सुवर्णा पाटील, डॉ.उत्कर्ष रेपाळ, सचिन पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौऱ्यावर आले होते.त्यावेळी ते पत्रकारांबरोबर बोलत होते.अगोदर त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत कोरोनाचा आढावा घेतला आणि रुग्णालयाला भेट दिली.यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असं वाटत नाही दारुच दुकान उघडताय, मॉल उघडताय, तुम्ही सगळ्या गोष्टी उघडताय आशा परिस्थितीत मंदिर उघडणे आग्रह असेल तर तो योग्य आहे.तो योग्य आग्रह आहे.धार्मिक स्थळे उघडल्यानंतर मला खात्री आहे की धार्मिक स्थळचे संचालन करणारे जे लोक आहेत.ती मंडळी सोशल डिस्टनन्स ठेवून आवश्यक काळजी घेऊन चालवतील जनतेला देखील समजत उद्या धार्मिक स्थळे उघडल्यावर लोक तेथे गर्दी करतील अशी परिस्थिती नाही जनतेत ही जागृती आहे. त्यामुळे साधारणपणे सर्व धर्मियांची अस म्हणणं आहे देशापेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही. देशातील सगळ्या राज्यांनी उघडले आहे.आणि एक महिन्यापासून उघडले आहे.केंद्र सरकारने उघडायला मान्यता दिली आहे. दारूची दुकाने उघडतात तर मंदिरे उघडायला काय प्रॉब्लेम आहे असा प्रश्न निर्माण होतो, असा सवाल साधत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.दरम्यान, इंजेक्शन चोरीबाबत छेडले असता त्यांनी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की आम्ही त्याचा रिपोर्ट घेत आहोत आणि नेमके किती कमी आहेत त्यांनी मान्य केले रिपोर्ट घेऊन चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले आहे.

जिल्हा रुग्णालयात दररोज किती रुग्ण येतात, किती जणांना सेवा दिली जाते, किती जणांचा मृत्यू होतो किती बरे होतात याचा आढावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांच्याकडून घेतला.त्यांनी आस्थेने डॉक्टर, नर्स यांची विचारपूस केली. नर्स संघटनेने रिक्त जागा भरण्याची मागणी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!