होमक्वारंटाईन केलेले व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार : प्रसाद काटकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २१ : आजपर्यंत फलटण शहरामध्ये एकही कोव्हिड-19 चा रुग्ण आढळून आलेला नाही. आता मात्र पुणे, मुंबई, ठाणे, पनवेल तसेच अनेक बाधित शहरातून काही नागरिक आपल्या मूळ गावी म्हणजे फलटणला येत आहेत. बाहेरून येणार्‍या व्यक्तींना त्यांच्या घरी सोय असेल तर आपण शासनाच्या धोरणानुसार त्यांना होम क्वारंटाईन (विलगीकरण) करत आहोत. अशी माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली असून पुढे ते  म्हणाले की आज अखेर फलटण शहरामध्ये 189 लोकांना होम क्वारंटाईन (विलगीकरण) करण्यात आले असून 28 जणांचे संस्थात्मक विलगीकरण केलेले आहे. मात्र ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले आहे. अशा व्यक्तीनी चौदा दिवस घरातून बाहेर पडावयाचे नाही. तरी देखील काही व्यक्ती घराच्या बाहेर पडत असताना आढळून आलेले आहे. जर होम क्वारंटाईन कालावधीमध्ये एखादी व्यक्ती बाहेर पडलेली आढळून आल्यास त्यांच्यावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई व फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल. याची त्यांनी नोंद घ्यावी. तसेच होमक्वारटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरत असताना  शहरातील नागरिकांच्या अथवा शेजारी राहणार्‍या नागरिकांच्या नजरेस आल्यास त्यांनी ताबडतोब फलटण नगर परिषद परिषद मधील खालील अधिकार्‍यांशी तातडीने संपर्क करावा आपले नाव गोपनीय ठेवले जाईल. असे हि शेवटी प्रसाद काटकर म्हणाले आहेत.  आपण सुज्ञ आहात, शासकिय नियमांचे पालन करा अणि स्वतःची,कुटुंबाची,गावाची काळजी घ्या व नियम पाळा, कोरोना टाळा असे आवाहन प्रसाद काटकर यांनी केले आहे.

संपर्क-

विनोद जाधव – 9860850350

जगदीश माळी – 9881681232

संतोष काकडे – 8007891524

गणेश काकडे-9762062323


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!