…तर फलटणची जनता रौद्ररूप धारण करेल; खासदार रणजितसिंह यांचा श्रीमंत रामराजेंना इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
गेल्या तीन दिवसांपूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या सभेत जे स्वत:ला फलटण तालुयाचे अधिपती म्हणवून घेतात, ते श्रीमंत रामराजे यांनी निवृत्त आयएएस अधिकारी विश्वासराव भोसले यांचे पाय काढले जातील, अशी भाषा केली. मात्र, पायच काय तर त्यांच्या केसालाही धका लागला तर फलटणची जनता रौद्ररूप धारण करेल व तुमच्या कमरेला लंगोटसुध्दा ठेवणार नाही, हे लक्षात घ्या, असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे यांना दिला आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, भाजपा प्रदेश प्रतिनिधी जयकुमार शिंदे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, लतीफ तांबोळी यांची उपस्थिती होती.

मी कधीही श्रीराम कारखान्याच्या विषयावर आजपर्यंत जाणीवपूर्वक बोललेलो नाही. सहकारामध्ये राजकारण नको, म्हणून आम्ही टाळाटाळ करत होतो. न आम्ही कुठले इलेशन लावले, न मार्केट कमिटी किंवा सहकारी संस्थेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. मी नव्याने संस्था स्थापन केल्या, चालवल्या व मोठ्याही केल्या. पण, जी संस्था स्वत:ची नाही, जी शेतकर्‍यांच्या मालकीची आहे, त्या शेतकर्‍यांच्या पोरांचे पाय काढायची भाषा जर तुम्ही करत असाल तर ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे यांना दिला आहे.

खासदार रणजितसिंह म्हणाले की, श्रीराम चालविण्यासाठी जवाहरच्या कुबड्या घेतल्या, स्वत:च्यात हिंमत नाही, बापजाद्यांनी काढलेले कारखाने दुसर्‍याला चालवायला द्यायचे, गेली १५ वर्षे त्या कारखान्याचा हिशोब नाही, जमिनी किती विकल्या ते माहिती नाही, कारखान्यावर कर्ज किती आहे, ते माहिती नाही. कारखान्याला वर्षाला जे उत्पन्न मिळते, त्याचा सगळा भोंगळ कारभार आहे. ज्या कारखान्याला वर्षाला १२ ते १३ कोटी भाडे मिळायला पाहिजे होते, त्या कारखान्याला पहिल्यांदा १० कोटी, नंतर ५ कोटी व आता ५० लाख भाडे केले आहे. म्हणजे ५० लाखात श्रीराम कारखाना जवाहरला चालवायला दिला आहे, एखादा पेट्रोल पंपही त्याच्यापेक्षा जास्त किमतीत लोकं चालवायला देतात. हा पैशाचा भ्रष्टाचार होत आहे, हे न कळायला आम्ही दूधखुळे नाही.

श्रीराम कारखाना कारखाना हा शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे. त्याच्या दराबाबत एखाद्या शेतकर्‍याने प्रश्न विचारला तर काय बिघडले, तो त्याचा हक आहे. मग त्याबाबत तुम्ही पाय काढण्याचा भाषा करत आहात, तर हा कारखाना तुम्ही स्वत:च्याच मालकीचा करा. स्वराज कारखान्याबाबत बोलण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही. स्वराज कारखाना गेली अनेक वर्षे श्रीराम कारखान्यापेक्षा १ रूपया नेहमी जास्तीचा दर देत आला आहे. हा कारखाना आम्ही तुमच्यासारखे कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ, राजकीय वरदहस्त नसताना मोठ्या हिमतीने वाढविला व आज हा कारखाना फलटण तालुयातील सर्वात मोठा कारखाना आहे. देशातील सर्वात मोठा डिस्टीलरीचा प्रकल्प स्वराज कारखाना चालवितो. दरही स्वराज सर्वात जास्त देतो व पेमेंटही स्वराज सर्वात जास्त देतो. तुम्हाला बँक चालविता आली नाही, ती बुलडाणा अर्बनला दिली. दूधसंघ बंद पाडला, खरेदी-विक्री संघ बंद पाडला, साखरवाडी कारखान्याचे वाटोळे केले. म्हणजे नेमकं खुपतंय काय? स्वराज कारखानाही तुम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप खा. रणजितसिंह यांनी रामराजेंवर केला.

आज मी फलटण तालुयात व माढा मतदारसंघात गेल्या तीन वर्षांत शेकडो कोटींची कामे आणली. ती आज पूर्णत्वाकडे चालली आहेत. तुमच्यात हिंमत होती तर हे तुम्ही मंत्री असताना का केले नाही. माझ्यावर आरोप केले तर मी सोडणार नाही, असा इशारा खा. रणजितसिंह यांनी रामराजेंना दिला.

तुम्ही आज विश्वासराव भोसलेंचा पाय काढण्याची भाषा केली. पायच काय तर त्यांच्या केसालाही धका लागला तर फलटणची जनता रौद्ररूप धारण करेल व तुमच्या कमरेला लंगोटसुध्दा ठेवणार नाही, हे लक्षात घ्या, असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्रीमंत रामराजे यांना दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!