दिगंबर आगवणेंनी फसवणुक केली असल्यास भाजपाशी संपर्क साधा; नाव जाहीर होवू देणार नाही : अनुप शहा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२२ । फलटण । तालुक्यामध्ये अपुर्या बुध्दीमत्तेची विघ्नसंतोषी माणसे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. सुर्यावर थुंकल्यावर थुंकी परत स्वतःवर पडते. भारतीय जनता पार्टी पुर्ण ताकदीने दिगंबर आगवणे यांच्या विरोधात उतरली असुन तालुक्यामधील कोणाचीही दिगंबर आगवणे यांनी फसवणूक केली असेल तर फलटण तालुका भारतीय जनता पार्टीशी संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.

फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, मराठा क्रांती मोर्चा फलटणचे समन्वयक व उद्योजक माऊली सावंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

दिगंबर आगवणे यांनी स्वतः खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे लागुन कारख्यान्याच्या कर्जात त्यांना सहकर्जदार करण्याची विनंती केली त्यावेळी त्यांना सहकर्जदार करून घेतले होते. कारखान्याला ज्या वेळी सर्व गोष्टी निदर्शनास आले त्याच वेळी कारखान्यानी सहकर्जदार काढून घेतले, असेही अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

स्वराज पतसंस्थेचे कर्ज हे दिगंबर आगवणे यांनी वेळोवेळी लढलेल्या निवडणुकीच्या प्रपत्रात दाखवले आहे. आता कुठेही वाचण्याची शक्यता नाही म्हणल्यावर एकेकाळी ज्यांच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत त्यांच्याकडेच जावुन मी कसा फसलो आहे हे सांगितले. फलटण तालुक्यात बर्याच जणांना दिगंबर आगवणे यांनी फसवले आहे. त्यातील काही जणांनी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. आता आगामी काळामध्ये पुर्ण ताकदीने दिगंबर आगवणे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी लढणार आहे, असेही अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

सन २०१३ ला पंचायत समितीची निवडणूक झाली नाही तर सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत कसे काय पैसे दिले. सन २०१२ साली पंचायत समितीची निवडणूक झाली आहे. तर २०१३ साली दिगंबर आगवणे यांनी पैसे दिलेच कसे, असेही अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिगंबर आगवणे यांनी कोणाचीही फसवणुक केली आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते अथवा माझ्याशी म्हणजेच अनुप शहा यांच्याशी संपर्क साधावा. फसवणुक झालेल्यांचे नाव न जाहीर करता आम्ही त्या फसवणूकदाराची संपुर्ण सहकार्य करू, असेही अनुप शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिगंबर आगवणे हे दैनंदिन व्यवहारात ॲट्रोसिटीचा वापर करतात : माऊली सावंत

दिगंबर आगवणे यांनी माझ्या कुटुंबीयांना फसवलेले आहे. पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर दिगंबर आगवणे यांनी माझ्या मुलाशी संपर्क साधून त्याला कायदेशीर कारवाई करणार असल्याची धमकी दिलेली आहे. दिगंबर आगवणे हे कायदेशीर कारवाई विशेषतः ॲट्रॉसिटीचा वापर दैनंदिन वापरात करतात याच्या विरोधात आता मराठा क्रांती मोर्चा तर्फे आम्ही रस्त्यावर उतरत आहोत, असे मत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!