शिक्षण क्षेत्रातील आयडियल व्यक्तीमत्व : डॉ. वैशाली शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज फलटण तालुक्यात शिक्षण क्षेत्र सर्वांगानेा विस्तारत आहे. आपल्या शैक्षणिक कार्य कर्तृत्वाबरोबर एक प्रेरणादायी, आदर्शवादी एक आराध्य व्यक्ती जिने नेहमीच तिचा आनंद, प्रेम, यश आणि तिची शक्ती त्या प्रत्येकासाठी सामायिक केली. ज्यांना ते पात्र आहेत, अशी व्यक्ती जिने तिच्या स्वकर्तृत्त्वावर यश मिळवण्यात नेहमीच अग्रणी राहिली. तिच्या बुद्धीचातुर्याने तिने अनेक शिखरे काबीज केली आहेत अशीच एक व्यक्ती म्हणजे….. डॉ. वैशाली शिंदे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या शैक्षणिक कार्यास सुरवात करुन ‘आयडीयल किड्स’ या इवल्याश रोपट्याचा आज ‘आयडियल इंटरनॅशनल’ स्कूल अ‍ॅड ज्युनियर कॉलेजच्या वटवृक्षात रुपांतर करुन डॉ. वैशाली शिंदे मॅडम या शिक्षण क्षेत्रातील मानदंड ठरल्या आहेत. असं लिहिण अतिशोयोक्तीचे होणार नाही.

सन 2007 मध्ये शिंदे मॅडम यांनी ‘आयडीयल किड्स’ या शाळेची मुहर्तमेढ रोवली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शाळा उभारणीचे धाडस करुन त्यांनी फुले दांपत्याच्या पावलावर पाऊल टाकले. आपल्या कल्पकतेच्या व बुद्धीच्या जोरावर त्यांनी अल्पावधीमध्येच फक्त दोन विद्यार्थ्यांवर सुरु केलेली शाळा तीचा आज वटवृक्ष झाला आहे. आपल्या आयडियल इंटरनॅशनल स्कूल नावाप्रमाणेच ‘आयडियल’ असलेल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा आजच्या युगाचा नायक आहे.

आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आंतराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्या कल्पनेला आपल्या शाळेचा विद्यार्थी पण स्मार्ट व्हावा म्हणून डॉ. वैशाली शिंदे मॅडम यांनी सीबीएसईची सोय केली. आयडियलच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाबरोबर संगीत, वैदिक, गणित, नृत्य, प्रश्‍नमंजुषा, बोलक्या पुस्तकांचा खजिना, संगणक ज्ञान यासारख्या उपक्रमांचा लाभ मिळतो.

पारंपारिक खेळ, मैदानी खेळ वक्तृत्व स्पर्धा विविध बौद्धिक स्पर्धापरीक्षा, यांसारख्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते उपक्रमांना डॉ. वैशाली शिंदे मॅडम नेहमीच प्रोत्साहन देत असतात.

Activity Based Learning & Best care with affection.

नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी व अद्ययावत माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 2009 ते 2014 युरो किड्स इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर आयडियल किड्स इंटरनॅशल स्कूल संलग्न केले. 2015-16 पासून पुढे हॉग-काँग स्थित ‘थिओ किड्स इंटरनॅशनल’ कडून आयडियल इंटरनॅशनल स्कूल संलग्न आहे. यु.के., ऑस्ट्रोलिया, थायलंड इ. देशातील अभ्यासपद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहेत. सतत नाविन्याचा ध्यास आणि स्पर्धा परिक्षांची तयारी केली जाते.

आपल्या ‘आयडियल इंटरनॅशनल स्कूल’च्या माध्यमातून दरवर्षी शिंदे मॅडम वीस विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च स्वत: करतात. तसेच मागील दोन वर्षी कठीण काळ म्हणून कोरोनाचा काळ समजला जातो. या काळामध्ये शिंदे मॅडम यांनी शाळेच्या फीमध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के फी माफी दिली होती. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे, खाऊ इत्यादीची मदत त्या दरवर्षी आपल्या वाढदिवसादिवशी करत असतात.

आपल्या शैक्षणिक कार्यासोबत सांस्कृतिक, सामाजिक कार्यात डॉ. वैशाली शिंदे मॅडम रेल्वे मंत्रालय या हिरीरीने पुढाकार घेत असतात. सध्या त्या भारत सरकारमध्ये रेल्वेच्या सल्लागार समितीवर कार्यरत आहेत. त्याचे कार्यक्षेत्र हे भारतीय मध्य रेल्वे आहे मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. त्याच्या या दाहीदिशा फैेलावणार्‍या यशस्वी कार्यकीर्दीचा सन्मान म्हणून प्राऊड ऑफ इंडिया, प्राऊड ऑफ महाराष्ट्र, स्टार आयकॉन ऑफ इंडिया, सुभाषचंद्र बोस स्मृतीसन्मान, सावित्रीबाई शिक्षण पुरस्कार आंतराष्ट्रीय संघनेकडून सन्मान इंडिया रेकॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित केले आहे.

फक्त शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर एक समाजसेविका म्हणूनही त्या कार्यरत आहेत समाजातील महिलांना बचतीचे महत्व पटवून स्वयंरोजगाराची कवाडे उघडून दिली. त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबीरे, महिला सबलीकरणासाठी व्याख्याने, महिलांसाठी लघुउदयोग अशा अनेक चांगल्या उपक्रमांची उभारणी केली.

फलटण शहराचं नाव निघालं की आजच्या या डिजीटल युगात डॉ. वैशाली शिंदे मॅडम आणि त्याच्या आयडियल इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅड ज्युनियर कॉलेजचे नाव आपोआप जोडल जातं. त्यांच्या अथक प्रयत्नांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे हात नेहमीच साथ देतात. आपल्या विद्यार्थीप्रिय स्वभावाला जागत त्या सदैव विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटत असतात.

तिमिरात असते साथ तुमची
आनंदात तुमचाच कल्ला असतो
अनुभवी आणि निरपेक्ष असा
कायम तुमचा सल्ला असतो

आदरणीय डॉ. वैशाली शिंदे मॅडम तुम्ही माझा आदर्श आहात नक्कीच माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती तुमच्यासारख्या अभ्ाुतपूर्ण व्यक्तीला माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. तुम्ही माझ्यासाठी केलेल्या अतुलनीय गोष्टीची मी कायम आठवण ठेवीन आणि प्रशंसा करेन. मॅडमचा वाढदिवस आयडियल स्कूलमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम/स्पर्धांनी साजरा होत असतो. या यशामध्ये शिंदे मॅडम, आयडियल विद्यार्थी, आयडियल शिक्षक व आयडियल पालकांना श्रेय देतात.

आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. वैशाली शिंदे मॅडम यांच्या आरोग्यसंपन्न दिर्घायुष्यासाठी आयडियल स्कूलच्या दैदीप्यमान यशासाठी शुभेच्छा.

– कु. किर्ती नाळे,

आयडियल शिक्षक.


Back to top button
Don`t copy text!