स्थैर्य, रहिमतपूर, (अविनाश कदम), दि 18 : पवारवाडी येथील नागरिकांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहिर केलेल्या निर्देशानुसार पुरेशी दक्षता घेवून ही महामारी थोपवायची आहे. “मीच माझा रक्षक” हे अभियान प्रभावीपणे राबवीत केलेल्या उपाय योजना द्वारे हे संकट परतवून लावता येवू शकते असे प्रतिपादन तहसिलदार रोहिणी शिंदे यांनी केले.
त्या पवारवाडी ता.कोरेगाव येथे कोरोना बाधीत आणखी रुग्ण सापडल्याने गावभेटी दरम्यान उपस्थित ग्रामरक्षक पथकातील फदाधिकारी, सदस्यासह ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी बीडीओ क्रांती बोराटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॕ राजेंद्र जाधव, आरोग्य विस्तार अधिकारी अमर निंबाळकर उपस्थित होते.
बीडीओ क्रांती बोराटे यांनी ग्रामस्थांनी अत्यावश्यक कारणा शिवाय घराबाहेर पडू नये. शासकीय नियम व सुचनांचे पालन करा असे आवाहन केले
पवारवाडी येथील 68 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची मुलगी निढळ ता,खटाव येथे दिलेली असून हे कुटुंब ठाणे येथे कायमचे वास्तव्याला असते. कोरोना बाधीत वृद्ध सास-यासोबत या कुटुंबातील लेक-जावई व दोन नातवंड मुंबई येथून पवारवाडी येथे आले होते. ग्रामस्तरीय कमिटीने त्यांना अगोदरच सावाधगिरी बाळगून पवारवाडी येथील शाळेत क्वारंटाईन केले हौते.
पवारवाडी येथील वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने त्यांचे निकटतम सहवासीत म्हणून या चौघांचा कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाब घेवून त्यांना ब्रम्हपुरी येथील विलगी करण कक्षात ऍडमिट केले होते. त्यांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. माञ स्थानिक नागरिक आरोग्य विभागाच्या सर्वेला चांगली साथ देत असल्याने गावात किंचीतही भितीचा लवलेश नाही.