स्थैर्य, फलटण : तालुक्याच्या विविध गावातून कोरोना बधितांची संख्या आजअखेर 95 इतकी झाली असून, यातील बहुतांश रुग्ण हे मुंबई व पुण्याच्या सामन्धीत आहेत. अन्य रुग्ण हे कोरोना बधितांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे मी मुबंईला गेलो नाही, मला कोरोना होणार नाही, या भ्रमात स्थानिक नागरिकांनी राहू नये, आपल्या आरोग्याची आपणच काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशाशनाकडून केले जात आहे.
मुंबई, पुणे व अन्य ठिकाणाहून फलटण तालुक्यात विविध कारणास्तव आलेल्या नागरिकांची संख्या हजारांच्या घरात असल्याचे समजते. यात मुबंईकर अधिक आहेत. बाहेरगावाहून आलेल्या अनेक जणांनी कोरोनाचा गांभीर्य माहीत असल्याने आपला होम किंवा संस्थात्मक क्वारंटाइनचा कालावधी चांगल्या प्रकारे पार पाडला आहे. त्यामुळे चिंता ही स्थानिक नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. मी मुबंईला गेलो नसलो, तरी लॉकडाउन शिथिल झाल्याने मुंबईकर व अन्य ठिकाणाहून आलेले नागरिक अवतीभवती वावरत आहेत, याची जाणीव समाजात वावरताना ठेवावी, अशी अपेक्षा फलटण येथील सुद्न्य नागरीकाकांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्ण संख्या 95 इतकी झाली असून, त्यापैकी ४७ जण बरे झाले, असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसत असल्यास घरातच सात ते आठ दिवस तरी स्वतंत्र राहिले पाहिजे. जर बरे वाटले नाही, तर जवळच्या ग्रामीण रुग्णालय अथवा कोविड सेंटर येथे तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क शिवाय वावरू नये, सामाजिक अंतर राखावे, सॅनिटायझरचा वापर करावा, कामाशिवाय शक्यतो बाहेर पडू नये, इतकी काळजी घेतली तरी कोरोनापासून दूर राहणे सहज शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.