तरास देणाऱ्या गोष्टी आयुष्यात खूप येतील, पण मोकळ्या मनाने सोडून द्यायला शिकायला हवं.
त्यानं मला कुत्सित नजरेनं बघितलं. त्यानं माझी काडी केली. मला फसवलं . मला धोका दिला.त्याला पाहूनच घेतो.
हे सगळं वर्षानुवर्षे आम्ही मनात साठवून ठेवलं आहे..
मोकळ्या मनाने सोडून द्यायला हवं. याच्यात गुरफटलो की कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या किड्या सारखी अवस्था होऊन जाते आपली. आपण एकदा जळयात अडकलो की आपली शिकार होणार हे नक्की. खरं तर शत्रूत्व नको मन मोकळं करावं.
पण शत्रुत्व ठेवायला नको. नाही तरी प्रत्येकाच्या मनामध्ये दहा-पंधरा जाणांची लिस्ट असतेच, त्यांना लथाबुक्क्यांनी मरावंसं वाटतं, शिव्या द्याव्याशा वाटतात.हा सगळा राग वर्षानुवर्षे आम्ही मानत दाबून ठेवलाय. मग कुठेतरी दंगल होते आणि भाजी आणायला गेलेला साधा माणूस सुद्धा हातात दगड घेऊन खळकन काचा फोडतो.
आमच्यातला राग असा नको तिथं बाहेर निघतो. जे जे मनात साचलं आहे ते ते सगळं सोडून द्यायला हवं. मन अगदी पिसासारखं हलकं हलकं करायला हवं..
किती दिवस रडत आणि राग -द्वेष घेऊन जगायचं?
कुठेतरी थोडं थांबून विचार करायला हवा की, आपल्याला देवाने एवढा छान जन्म दिला आहे, ह्याच्यापेक्षा पेक्षा अजून वेगळं काय द्यायला हवं त्यानं? आपणही काही नकोच मागायला त्याला. त्याला जे द्यायचं ते एकदाच दिलंय त्यानं.आता मात्र आपण कामवायला हवं.. आपल्या हिमतीवर. देवाला गेलंच तर त्याच्या बद्दल फक्त कृतज्ञता व्यक्त करायला जावं..
जन्माला आलो तेव्हा सगळंच दिलंय त्यानं.
सगळं माझंच आहे ही भावना असायला हवी मनात. नदी-नाले, सूर्य-चंद्र, हवा- पाणी हे सगळं तर पुरेसं दिलंय की त्यानं. मनगटात बळ आणि मनात जिद्द पण दिलीय की त्यानं.. सगळं काही नावावर असावं ही भावना आली की दुःख सुरू होतं. एकदा सगळं आपलं आहे असं मानलं आणि त्यातलं थोडसं उपभोगायचं बाकी सगळं इथंच सोडून जायचंय हे कळलं की जगणं सोपं होऊन जातं.
आपलाच स्वरुपी – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१