सातार्‍यात मी मराठी-स्वाक्षरी मराठी अभियानाचा सुरुवात

नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते शुभारंभ;मराठी भाषा पंधरावड्या निमित्ताने मसाप शाहूपुरी शाखेचा उपक्रम


सातारा – ‘मी मराठी-स्वाक्षरी मराठी’ या अभियानाचा शुभारंभ करताना नगराध्यक्ष अमोल मोहिते. त्यावेळी डावीकडून राजू गोरे, अजित साळुंखे डॉ. राजेंद्र माने, अ‍ॅड. दत्तात्रय बनकर, श्रीनिवास वारुंजीकर, नंदकुमार सावंत.

स्थैर्य, 8 मार्च, सातारा : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सातार्‍यातून मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर मराठी भाषा पंधरावड्याच्या च्या निमित्त मी मराठी-स्वाक्षरी मराठी या अभियानाचा शुभारंभ सातार्‍यातील राजवाडा येथील गोलबाग येथे करण्यात आला. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते या अभियानाच्या सुरुवात करण्यात आली आहे.

नगरपालिका व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी (सातारा) यांच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय बनकर, नगरसेवक राजू गोरे,जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्रीनिवास वारुंजीकर, जिल्हा कार्यवाह व परिषद सदस्य अजित साळुंखे, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, डॉक्टर राजेंद्र माने, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने,सचिन सावंत, वजीर नदाफ,अमर बेंद्रे उपस्थित होते.

नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले की, मी उपनगराध्यक्ष असताना सातारा नगरपालिका आणि मसाप शाहूपुरी शाखेचा वतीने सातार्‍यात मराठी भाषा पंधरवडा सुरू झाला. गेले पंधरा वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. मराठी भाषा समृद्ध आणि जतन करायची असेल तर त्याची सुरुवात घरापासून केली तर त्याची व्याप्ती वाढेल. मी मराठी स्वाक्षरी मराठी अभियानाची सुरुवात सातार्‍यातून झाली हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे यावे त्यांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष अ‍ॅड.. बनकर म्हणाले,   आपल्या बोली भाषेमध्ये मराठीचा वापर करणे आवश्यक आहे. इंग्रजी सही कॉपी करता येतो मराठीची कॉपी करता येत नाही. आज मी मराठी स्वाक्षरी मराठीचा शुभारंभ होत असताना याची व्याप्ती देशभरात व्हावी यासाठी आम्ही सर्वजण योगदान देऊ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ज्येष्ठ पत्रकार वारुंजीकर म्हणाले, इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे. लंडनमध्ये सर्वात जास्त लोक इंग्रजी विषयात नापास होतात. आणि आपल्या पुण्यामध्ये मराठीमध्ये नापास होणार याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपण आपली भाषा प्रेमाने बघतो हे यावरून स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. त्यांच्या वारसांनी तो जतन केला आणि वाढवला ही

मराठी ही भारताची राष्ट्रभाषा होती त्यावेळेस मोडी लिपी होती नंतर देवनागरी झाली. त्यानंतर हिंदी आली आणि ती भाषा आपल्यावर लादली गेली. माझा कोणत्याही भाषेवर द्वेष नाही. परंतु आपली प्रथम भाषा ही मराठीच असली पाहिजे असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र माने यांनी केले सूत्रसंचालन अ‍ॅड. चंद्रकांत बेबले यांनी केले तर आभार नंदकुमार सावंत यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!