दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२३ । नातेपुते । छत्रपती संभाजी महाराज जयंती व मातृ दिनानिमित्त लाखो मुलांना घडविणारी चंद्रपुरी पाठशाळा 1940 ला वालचंद शेट ने निर्माण केलेल्या शाळेत 1970 पासून ते 1990 च्या दरम्यानचे 150 मुलांनी सहभाग घेऊन सकाळी प्रभात फेरी काडून जुन्या अनेक आठवणींना उजाळा देत वर्गशिक्षक यांचे घरी अभ्यास केला म्हणून त्यांचे घरासमोर , स्वतः पूर्वी रहात होते म्हणून त्या पडक्या घरासमोर,विहिरी चे रहाट गाडे, मोठी झाडे असे विविध ठिकाणी फोटो का आठवणी जपत या वर्षी 14 मे 2023 रोजी दिवसभर मेळावा आयोजित करीत अनेकांनी कॉमन दिव्याखाली अभ्यास,इतर अनुभव चंद्रपूरी पाठशालेणे घडविले म्हणूनच आम्ही घडलो असे अनुभव प्प्रत्येकानी सांगत रात्री शाळेत ,सभामंडपात स्टेज वर एकत्रित झोपण्याचा ,गप्पा मारण्याचा आनंद देखील मोठा घेतला म्हणून माजी विद्यार्थि मोहन जाधव,सत्यशोधक ढोक,मारुती दराडे,उमाजी चव्हाण , सुनील कुलकर्णी, यांनी मनोगत व्यक्त करीत काही सूचना देखील केल्या त्या शेळके सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पूर्ण करू म्हणत वेळोवेळी माजी विद्यार्थि,ग्रामपंचायत व इतर मंडळी मदत करीत असतात याबद्दल तसेच प्रथमच आमदार शाळेच्या कार्यक्रमाला आले म्हणून सर्वांचे आभार मानत म्हंटले की पंढरपूर चे दर्शन घेण्यासाठी वारकरी न सांगता जातात त्याप्रमाणे या शाळेला माजी विद्यार्थी सोबत त्यांचे कुटुंब यांनी पण न सांगता दरवर्षी भेट द्यावी.
यावेळी आमदार सातपुते यांचा सत्कार शाळेचे माजी विद्यार्थी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले फोटो फ्रेम ,शाल आणि ढोक लिखित फुले दाम्पत्य ग्रंथ भेट दिले तर 1975 चे माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील 11 निवृत्त फौजी सैनिकांचा शाल , श्रीफळ गुच्छ देऊन यतोचीत गौरव करून सन्मान केला तसेच इतर समाजसेवक ,इतर अधिकारी यांचा देखील सन्मान केला.
याप्रसंगी आमदार सातपुते म्हणाले की मी अनेक ठिकाणी इ.10 वी ,पुढील माजी विद्यार्थी मेळावा पाहिला ,अनुभवला परंतु या ठिकाणी 1940 साली बांधलेल्या पाठशाळेतील 1970 पासूनचे विद्यार्थी जे की बरेच जण आपल्या नोकरीतून , व्यवसायातून निवृत्त झालेले समवेत नवीन पिढीतील देखील विद्यार्थि एकत्र आलेले पाहिले.या सर्वांचे आपल्या बालपणीची शाळा प्रती असलेली आपुलकी जिव्हाळा पाहून आनंद वाटला सोबत मला सहभाग घेता आला. शाळेची वास्तव अडचणी पहाता लवकरच शाळेची संरक्षक भिंत व इतर कामे करणे माझी नैतिक जबाबदारी असल्याचे समजून काम पूर्ण करणार आहे.तसेच ढोक सरांनी शाळेसोबत चंद्रपूरी ग्रामस्थांचे भविष्यनिर्वाह निधीची प्रकरणे ,अडचणी व इतर कामे सांगितले. ते देखील मी करणार असून त्या कामी एक व्यक्ती नेमून माझे कडून हक्काने कामे करून घ्यावीत.त्यास मी बांधील आहे असे आश्वासन दिले.तसेच या शाळेतील मुलांनी जिल्हा पातळीवर बक्षिसे मिळविली म्हणून आमदारांनी मुख्याध्यापक किसन शेळके,विद्यार्थी आणि सहशिक्षक यांचे अभिंनदन केले.
यावेळी माजी विद्यार्थि पप्पू महाजन त्यांचे कुटुंब यांनी शाळेला पूर्ण कम्प्युटर सेट ,.रावसाहेब काटे यांनी 10 बाय 10 चे 2 सतरंज्या,वसंत कांबळे यांनी 100 व्ह्या,आणि रघुनाथ ढोक यांनी महापूर्षांचे ग्रंथ भेट दिले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर अध्यक्ष म्हणून मुक्याध्यापक किसन शेळके, संयोजक रावसाहेब काटे,उदय भागवत,सरपंच संताजी बोडरे उपसरपंच गणेश भोईटे, सत्यशोधक रघुनाथ ढोक, पप्पू महाजन, निवृत्त फौजी कांता काटे , भटक्या विमुक्त महाराष्ट्र संघटेनेचे अध्यक्ष व मार्केट कमिटी संचालक लखन चव्हाण, माजी सरपंच व तंटा मुक्ती चे अध्यक्ष दादासो चव्हाण,प्रा.वसंत कांबळे,उदय कुलकर्णी इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक स्वागत प्रा.अशोक रुपनवर ,सुंदर प्रबोधनात्मक सूत्रसंचालन प्रा.हरिभाऊ सकट ,आभार मोहन जाधव यांनी मानले तर मोलाचे सहकार्य ग्रा. प.सदस्य महादेव जानकर,पैगंबर मुल्ला,अनिल गायकवाड,अब्दुल मुल्ला,शरद ननावरे,बाळासाहेब काटे यांनी केले.