मनसेच्या निवेदनाशी माझा कोणताही संबंध नाही : आयाज कोतवाल


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२२ । फलटण । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बेकायदेशीर भोंग्याच्याबाबत देण्यात आलेल्या निवेदनाशी माझा कोणताही संबंध नाही. तसेच गैरसमज पसरवणार्या संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे अयाज उर्फ शाहिर कोतवाल यांनी केलेली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, फलटण यांच्या तर्फे फलटण शहर व तालुक्यातील मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत युवराज आमृत शिंदे, रा. ठाकुरकी, फलटण यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले आहे. त्या निवदेनात आयाज कोतवाल नावाचा उल्लेख आहे. मात्र मनसेच्या या प्रकरणाशी किंवा निवेदनाशी माझा काहीही संबंध नाही. माझे नाव मुद्दाम लबाडीने व हेतुपुरस्पर घेवुन हिंदू – मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या कुटील डाव व प्रयत्न सुरू आहे. तरी याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आयाज कोतवाल यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!