दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । रायगड । शिवाजी महाराजांच्या समर्थ नेतृत्वाखाली, या संपूर्ण प्रदेशाच्या वैभवात वाढ झाली आणि देशभक्तीची भावना पुन्हा निर्माण झाली. 19 व्या शतकातील ‘शिवराज-विजय या संस्कृत ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत प्रभावी वर्णन केले आहे याचा त्यांनी उल्लेख केला. देशातील जनतेला, विशेषतः युवा वर्गाला महाराजांच्या महान व्यक्तिमत्त्वाशी परिचित होता यावे आणि महाराजांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य समजून घेता यावे यासाठी या ग्रंथाचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजचे अभिवादन हे माझ्यासाठी एखाद्या तीर्थयात्रेसारखी आहे असे मत भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज महाराष्ट्रातील रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोलत होते.
यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी भविष्यकाळाचा वेध घेणारी होती. महाराजांनी त्यांच्या ‘अष्टप्रधान’ नामक मंत्रिमंडळाच्या मदतीने दूरदर्शी परिणाम साधणारे अनेक निर्णय घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिल्या आधुनिक नौदलाची उभारणी सुद्धा केली होती.