
स्थैर्य, फलटण, दि. २१ : लोकमतचे जिंतीचे प्रतिनिधी प्रशांत रणवरे यांना जीवे मारण्याची धमकी वाळू माफियांनी दिली. त्या संदर्भात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पोलीस प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. तरी या बाबतीत फलटणचे पत्रकार जी भुमिका घेतील त्यांच्या सोबत मी कायम आहे. आंदोलन करण्याची जरी वेळ आली तरी फलटणच्या पत्रकार जी भुमिका घेतील त्यांच्या सोबतच मी असेन, अशी ग्वाही माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.