निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही, चर्चा करायला ‘विचारांची लेव्हल’ लागते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 23 : राष्ट्रवादी नेते, आमदार रोहित पवार व माजी खासदार निलेश राणे यांच्यात काही दिवसांपूर्वी चांगलेच ट्विटरवॉर रंगले होते. साखर उद्योगावरील शरद पवारांवरील ट्विटला आमदार रोहित पवार यांनी निलेश राणेंना उत्तर दिल्यानंतर निलेश राणे यांनी रोहित पवारांवर तीव्र शब्दात टीका केली होती. त्यानंतर रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात वादात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली होती. या वादातून निलेश राणे यांनी रोहित पवारांना थेट धमकी दिली होती. त्याबाबत, मौन बागळलेल्या रोहित पवार यांनी निलेश राणेंच्या धमकीला मी घाबरत नाही, असे म्हटले आहे.

आमदार रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विटरवरुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना थेट धमकी देत त्यांना आव्हान केलं. त्यावरुन रोहित पवारांनी ट्विट करत आपले विचार,आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो असा टोला निलेश राणेंना लगावला. त्यानंतर रोहित पवारांच्या या ट्विटला निलेश राणेंनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, बोलणाऱ्याची लायकी बघून मी उत्तर देतो धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझं काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला अशी अप्रत्यक्षरित्या धमकी दिली होती. राणेंच्या या ट्विटनंतर रोहित पवारांनी प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र, बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मी धमकीला घाबरत नसल्याचे म्हटले आहे.

आमदार रोहित पवार अन् निलेश राणे यांच्यातील ‘ट्विटर युद्ध’ पेटलं; मला, बोलत राहिलास तर…

”चर्चा करण्यासाठी कुठेतरी विचारांची लेव्हल लागते, ती लेव्हल त्याठिकाणी मला जाणवली आहे. तसेच, अनेक अभ्यासू लोकांनी मला याकडे दुर्लक्ष करण्याचं सूचवलं. त्यामुळे मी आता याकडे दुर्लक्ष करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटले. तसेच, नितेश राणेंकडून देण्यात आलेल्या धमकीवर बोलतानाही, मोकळ्या भांड्याचा आणि भरलेल्या भांड्याचा फरक सांगत, मोकळ्या भांड्याचा आवाज जास्त येत असतो. त्यामुळे, या धमकीला मी घाबरत नाही, अन् अशा धमकींना कुणीही घाबरत नसतं, असे म्हणत नितेश राणेंकडे आता आपण दुर्लक्ष करत असल्याचेही” रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सौ. BBC न्युज 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!