हायपरसॉनिक झेप:भारताने मिळवले स्वदेशी हायपरसॉनिक तंत्रज्ञान: आवाजापेक्षा 6 पट अधिक वेग मिळवण्यात यश! हायपरसॉनिक तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.७: भारताने हायपरसॉनिक टेक्नोलॉजी डेमोनस्ट्रेटर (एचएसटीडीव्ही) स्वदेशात तयार करण्यात यश मिळवले आहे. हे भारतीय संरक्षण आणि विकास संस्था डीआरडीओचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. ओडिशातील बालासोर येथील एपीजे अब्दुल कलाम रेंजवर सोमवारी याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी स्क्रॅम जेट इंजिनच्या मदतीने लाँच करून घेण्यात आली. याबरोबरच हायपरसॉनिक स्पीड मिळवणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. आतापर्यंत हे तंत्रज्ञान केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होते.

संरक्षण मंत्र्यांनी केली डीआरडीओचे अभिनंदन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून डीआरडीचे कौतुक केल “पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारत व्हिजन पूर्ण करणे आणि हे यश मिळवल्याबद्दल डीआरडीओच्या टीमचे अभिनंदन करतो. मी या टीमच्या संशोधकांशी बोललो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. भारताला त्यांच्यावर अभिमान आहे.”

5 वर्षांत तयार करणार हायपरसॉनिक मिसाइल

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, भारत येत्या 5 वर्षांमध्ये हायपरसॉनिक मिसाइल तयार करू शकेल. एका सेकंदात दोन किमी अंतर पार करणारे हायपरसॉनिक मिसाइल आवाजापेक्षा 6 पटी अधिक वेगवान असतात. भारतात तयार होणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये स्क्रॅमजेट प्रपल्शन सिस्टिम असणार आहे.

सर्व मापदंडांवर खरे ठरले तंत्रज्ञान

या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे डीआरडीओ प्रमुख जी सतीश रेड्‌डी टीमने सोमवारी सकाळी 11.03 मिनिटाला प्रायोगिक लाँच केले. चाचणीची प्रक्रिया 5 मिनिटे सुरू होती. चाचणीसाठी लाँचिंग कंबशन चेम्बर प्रेशर वेहिकल, एअर इनटेक आणि कंट्रोल असे सर्वच मापदंड तंतोतंत ठरले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!