पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । सातारा । पत्नीचा चारित्र्याचा संशय घेऊन तिचा धारदार शस्त्राने खून केल्या प्रकरणी आरोपी भारत कमलाकर जाधव वय 27 रा प्रतापगंज पेठ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली . पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन एल मोरे यांनी हे सोमवारी आदेश दिले

या खटल्याची माहिती अशी आरोपी भारत जाधव याने दिनांक 27 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान पत्नी श्रद्धा हिचा चारित्र्याच्या संशयावरून भांडणा दरम्यान धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केला होता . आरोपीने मयता ने इमारतीच्या खाली येऊन बचावाचा प्रयत्न केला मात्र आरोपीने तिला गाठून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले .

या प्रकरणी आरोपी जाधव याला शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी अटक केली . या तपासा दरम्यान धुमाळ पोलीस हवालदार श्रीनिवास देशमुख व अतिश घाडगे यांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . या प्रकरणाची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन एल मोरे यांच्या दालनात झाली . या प्रकरणी एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले . प्रत्यक्षदर्शी नी दिलेली निर्भिड साक्ष , परिस्थितीजन्य शास्त्रोक्त पुरावे व सरकार वकील महेश कुलकर्णी यांनी भक्कमपणे केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली . पोलीस प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव , शिवाजी घोरपडे शुभांगी भोसले , शमशुद्दीन शेख , जी एच फरांदे , राजेद्र कुंभार , अश्विनी घोरपडे , अमित भरते यांनी या सदर खटल्या संदर्भात विशेष सहकार्य केले .


Back to top button
Don`t copy text!