दैनिक स्थैर्य | दि. ६ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.२४ जानेवारी रोजी कृषी महाविद्यालय शेती विभागात महिलांसाठी ‘हुरडा पार्टी’ आयोजित करण्यात आली होती.
पारंपरिक पध्दतीनुसार ज्वारीच्या कोवळया दाण्यांपासून तयार करण्यात येणारा हुरडा आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त समजला जातो. यामध्ये डायेटरी फायबर्स, प्रथिने वेगवेगळे मूलद्रव्ये जसे की मॅग्नेशिअम, कॅल्शीयम पोटॅाशियम फॉस्फरस व जीवनसत्व या पोषक घटकांचा एक उत्तम स्त्रोत म्हणजे ‘हुरडा’, यालाच भारतामध्ये काही ठिकाणी ‘पॉक’ असेही म्हटले जाते. महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर ‘फुले मधुर’ या सुधारीत वाणाचे हुरडयासाठी उत्पादन घेण्यात आले.
कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक, फलटण नगरपालिका, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर, सौ. सुरेखा निकम मॅडम, श्रीमती आळतेकर मॅडम, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस्. डी. निबांंळकर सर, शेती फार्मचे श्री. राजेंद्र पवार, प्रा.सांळुखे एस. एम. सर आदी मान्यवर उपस्थित राहून आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि लाभदायी ‘हुरडा पार्टीचा’ आस्वाद घेतला.
शेतकरी बांधवांनी अशा पारंपरीक हुरडा पार्टीचे आयोजन केल्यास त्यांना अर्थार्जनाचे माध्यम उपलब्ध होेवु शकते, तसेच याला ‘अॅग्रो टुरिझम’ क्षेत्रातही भरपूर वाव आहे. हुरडा ज्वारीची लागवड केल्यास २० ते २५ क्विटल हेक्टरी हिरवा हुरडा मिळू शकतो. हुरडा ९५ ते १०५ दिवसात काढणीस तयार होतो. प्रती हेक्टरी रू. ८०००/- इतका खर्च येता ेआणि त्यापासून सरासरी अंदाजे १ ते १.५ लाख रूपये इतका निव्वळ नफा मिळू शकतो. त्यामुंंळे शेतकरी बांधवांनी हुरडा ज्वारीची लागवड व्यापारी तत्वावर करावी, म्हणजे या व्यवसायापासुन अधिक प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो.