वन्य प्राण्यांची शिकार केल्यास तात्काळ ‘जेल’ होऊ शकते : वनरक्षक बाळासाहेब गोलांडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ फेब्रुवारी २०२३ । बारामती । पाणी पिण्यासाठी आलेल्या किंवा वन विभागातील वन्य जीवाची ,शिकार करणे कायद्याने गुन्हा असून वन अधिनियमन १९२७ नुसार ५ वर्षाची सजा होऊ शकते त्याच प्रमाणे काही वन्य प्राणी लहान असताना बेल्ट व त्यामध्ये मोबाईलची जीप असून त्याची मॉनिटरी वनपरिक्षेत्र कार्यालय बारामती व पुणे येथून होत असून कोणीही वन्य प्राण्यांची शिकार करू नये अन्यथा सजा म्हणून जेल मध्ये जावे लागेल असा इशारा वनरक्षक बाळासाहेब गोलांडे बारामती यांनी दिला.

बारामती तालुक्यातील कण्हेरी, काटेवाडी, तांदुळवाडी ,उंडवडी, जराडवाडी, गोजुबावी, सावळ, पारवडी ,या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर व वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप मुथा व निसर्ग प्रेमी मित्र मंडळ च्या वतीने वन विभागाच्या हद्दी मध्ये उन्हाळच्या दिवसांमध्ये
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे तयार करून त्यामध्ये टँकर च्या माध्यमातून पाणी सोडण्याचा उपक्रम वेळी वनरक्षक बाळासाहेब गोलांडे बोलत होते.

तीव्र उष्णता व उन्हाळा चालू असताना पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात परवड होते व पाण्याच्या शोधार्थ ते मानवी वस्ती कडे येतात त्यामुळे चुकून किंवा मुदामहून त्यांची मानवाकडून शिकार होते म्हणून केवळ पाण्यासाठी वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून सदर उपक्रम उन्हाळा संपेपर्यंत व प्रत्येक वर्षीच्या उन्हाळ्यात करणार असल्याचे दिलीप मुथा यांनी सांगितले . वन विभागात शेकोटी करणे, धुम्र पान करणे ,पार्ट्या करणे आदी माध्यमातून वनविभागात आग लागण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे वनविभागात किंवा वनविभागा च्या शेजारी असे प्रकार करू नये असेही बाळासाहेब गोलांडे यांनी सांगितले. आभार महेश शिंदे यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!