वन विभागाची मोठी कारवाई : 12 जणांना अटक, 10 वाघरीसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थैर्य,सातारा, दि. 18 : वन विभागाने कारवाई करून पाडळी, ता. सातारा येथे छापा मारून मोठ्या प्राण्यांची शिकार करणारी टोळीतील तब्बल 12 जणांना पकडले असून त्यांच्याकडून दह वाघर्या, काठ्या, छोटा हत्ती टेम्पो, 4 दुचाकीसह 4 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल राठोड व वनपरिमंडळ अधिकारी परळी योगेश गावित यांना पाडळी, ता. सातारा येथे एक मोठी शिकारी टोळी शिकार करत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी कारवाईसाठी दोन पथके बनवून पाडळी येथे जावून घटनास्थळी घेरा घातला व बारा जणांना पकडले. दत्तात्रय विजय पाटील वय 33 रा. हरपळवाडी, ता.कराड, आकाश रमेश आवळे वय 23 रा. अतित, ता. सातारा, तुषार अंकुश काळे वय 25 रा.अतित, अमर राजकुमार काळे वय 25 रा. नागठाणे, ता. सातारा, विशाल बबन भिंगारे वय 23 रा. इंदोली, ता.कराड, मंगेश संजय जाधव वय 24 रा. नागठाणे, सयाजी भिकू मदने वय 33 रा. इंदोली, श्रीमंत रामचंद्र गायकवाड वय 25 रा.अतित, चैतन सुनिल काळे वय 22 रा. नागठाणे, सोमनाथ एकनाथ काळे वय 30 रा. नागठाणे, अजित श्रीरंग जाधव वय 36 रा. किवळ, ता. कराड, गणेश दादा चव्हाण वय 29 वर्ष रा. अतित अशी संशयीतांची नावे आहेत. सर्वजण शिकारीत माहीर असून त्यांच्याकडून शिकारीकरिता वापलेले 10 वाघरा (लांबी 900 मी.), 50 लाकडी काठ्या 50, चार दुचाकी, छोटा हत्ती 1 असे सुमारे 4 लाख 46 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला मुद्देमाल पाहता खास शिकारीसाठी या जाळ्या बनवल्याचे गुन्ह्यात समोर आले आहे.
संशयीत हे स्थानिक शेतकर्यांच्या शेतात वन्यप्राणी असल्याचे कळताच शेतात चारी बाजुने जाळी लावून शिकार करत असल्याचे समोर आले आहे. भारतसिंह हाडा उपवनसंरक्षक (प्रा.) सातारा व विश्वास भडाळे सहा.वनसंरक्षक (वनी.) सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शितल राठोड, वनपरिमंडळ अधिकारी परळी योगेश गावित, सुहास भोसले, वनरक्षक राज मोसलगी, महेश सोनावले, रणजित काकडे, संतोष काळे, मारुती माने यांची टिम पुढील चौकशीचे काम करत आहे.