दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । पंढरपूर । कामगार कल्याणकारी मंडळाकडून असंघटित वर्गातील कामगारांसाठी विविध योजनांचा समावेश केला आहे. रोजगार व सेवाशर्ती नियमन कायद्यानुसार असंघटित कामगारांना राज्य शासनाकडून सुरक्षा,आरोग्य, मुलांसाठी स्कॉलरशिप, दुर्घटना विमा, गट विमा, वैद्यकीय खर्च, महिला कामगारांसाठी मातृत्व लाभ, आरोग्य तपासणी, गृहनिर्माण योजना, मध्य अन्न योजना इत्यादी उपाययोजनांचा व सुविधांचा लाभ असंघटित कामगारांना मिळवून देण्याचे काम सत्यशोधक कामगार संघटनेचे मार्गदर्शक रवी सर्वगोड यांच्या प्रयत्नातून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर शहरातील असंघटित नोंदणीकृत शंभर (१००) कामगारांना दररोज मध्यान्ह भोजन सुरु करण्यात येत आले. असंघटित कामगारांना मध्यान्ह भोजनाचा प्रारंभ अमरभीम चौक, आंबेडकर नगर येथे करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रदीप परकाळे, विजय शिकतोडे, राजाभाऊ ढवळे,बाळासाहेब साखरे, मारुती प्रक्षाळे, समाधान भोसले, सुरेश सर्वगोड, गणपत सर्वगोड, सुरेश बिनवडे, प्रफुल्ल कांबळे, भारत सोनवले, विशाल ऐदाळे, इंद्रजीत वाघमारे, सिध्दनाथ सावंत, गणेश ननवरे, संतोष सर्वगोड,सागर धनवजीर, आनंद सर्वगोड, स्वप्निल सर्वगोड,युवराज माने, सीताराम वाघमारे, जयसिंग माने, स्वप्निल कांबळे, आकाश सर्वगोड, भुषण सर्वगोड इत्यादी उपस्थित होते.