दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२४ | फलटण | येथील ब्राह्मण गल्ली येथील शेकडो महिलांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होण्यासाठी संपूर्ण शहर पिंजून काढण्याचे आश्वासन यावेळी महिलांनी ॲड. सौ. जिजामाला यांना दिले आहे.
फलटण येथील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या “राजभवन” या निवासस्थानी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण शहरातील ब्राह्मण गल्ली येथील शेकडो महिलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. यावेळी भाजपा महिला तालुकाध्यक्ष उषा राऊत, सरचिटणीस शर्मिला रणवरे तालुका, शहर सरचिटणीस प्रियांका कदम, शहर उपाध्यक्ष मनीषा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वात फलटण शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येत आपली ताकद आता विधानसभा निवडणुकीत दाखवून दिली पाहिजे. आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी प्रत्येक घरातील महिलांनी आता काम करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भरघोस अशी मदत मिळाली आहे. आगामी काळामध्ये सुद्धा ही मदत सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून जाणे गरजेचे आहे; असे मत ॲड. सौ. जिजामाला यांनी व्यक्त केले.
फलटण शहरातील ब्राह्मण गल्ली येथील महिलांचा भारतीय जनता पार्टी मध्ये उर्मिला कोरे, मीना बारसे, मीरा हिरणवाळे, सुवर्णा घाडगे, पूजा शिरसागर, रोहिणी खटावकर, शितल साळुंखे, संगीता तेली, स्वप्नाली कर्वे, रोहिणी डमकले, दिपाली गवरे, कोमल पिसाळ, सरोज खंडेलवाल, मंदा राऊत, साक्षी रासकर, शितल चव्हाण यांच्यासह अनेक महिलांनी यावेळी प्रवेश केला आहे.