
स्थैर्य, सातारा, दि.17 ऑक्टोबर : ‘छत्रपती शिवाजी महारा महाराज की जय.. हर हर महादेव’ अशा नशा जयघोषात पारंपारिक पोशाखात किल्ले सज्जनगडावर यावर्षीचा सहावा मशाल महोत्सव संपन्न होत आहे. सज्जनगड बस स्थानक ते सज्जनगड नगर प्रदक्षिणा मार्गावर शेकडोमशाली प्रज्वलित होणार आहेत. यावेळी शिवभक्तांची मांदियाळी गडावर होते.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण दिवाळी पाडवा हे मराठी सण साजरे करत आहोत अशा गडकिल्ल्यांवर ही आपल्या मशाली प्रज्वलित राहिल्या पाहिजेत. आपले गड किल्ले संवर्धन व्हावेत ऐतिहासिक खेळ अशा गड किल्ल्यावरसाजरी व्हावेत या उद्देशाने दुर्गनाद प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षापासून किल्ले सज्जनगडावर मशाल महोत्सव ऐतिहासिक खेळ शाहीर पोवाडे साजरे करत आहे.
सोमवार दि. 20 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता सज्जनगड वाहनतळ येथे शिवप्रेमी, समर्थ भक्त दुर्गप्रेमींनी उपस्थित राहणार असून साडेतीन वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना अश्व मानवंदना देण्यात येणार आहे. चार वाजता वाहनतळ येथे श्री रामदास स्वामी संस्थान अध्यक्ष बाळासाहेब स्वामी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हलगी शिंग तुतारीच्या निनादात पालखी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
साडेचार वाजता अंगलाई देवी मंदिराजवळ श्री समर्थसेवा मंडळाचे कार्यवाहक योगेशबुवा रामदासी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येणार आहे. पावणे पाच वाजता पालखी मिरवणुकी दरम्यान धाब्याच्या मारुती मंदिरा जवळ पटांगणामध्ये मावळा प्रतिष्ठान अतीत यांच्या माध्यमातून ऐतिहासिक साहसी आगीचे खेळ सादर करण्यात येतील. पहाटे पाच वाजता श्रीराम मंदिर श्री समर्थ
रामदास स्वामी समर्थ समाधी मंदिरासमोरील अशोक वन येथे राष्ट्रीय शाहीर श्री रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचा भव्य दिव्य असा शिवकालीन ऐतिहासिक पोवाड्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यानंतर सात वाजता ध्येयमंत्र प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.