
स्थैर्य, मलकापूर, दि.१०: पर्यावरण व वातावरणातील बदल विभाग मंत्रालयाच्या वतीने दाेन ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये माझी वसुंधरा अभियान (Majhi Vasundhara Abhiyan) राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने येथील पालिकेच्या वतीने नुकत्याच काढलेल्या सायकल महारॅलीचे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महारॅलीचा प्रारंभ ढेबेवाडी फाटा येथे पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी झेंडा दाखवून केला. या वेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, इंद्रजित चव्हाण, आनंदी शिंदे, गीतांजली पाटील, नंदा भोसले, कमल कुराडे, पूजा चव्हाण, नगरसेवक सागर जाधव, आनंदराव सुतार, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, हॉटेल असोसिएशनचे श्री. कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष सलीम मुजावर व सदस्य, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुशांत व्हावळ, डॉ. संजय पवार, नूतन मराठी विद्यालयाचे शिक्षकवृंद व विद्यार्थी, तसेच माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी मनीषा फडतरे, पुंडलिक ढगे, विभागप्रमुख राजेश काळे, शशिकांत पवार, आत्माराम मोहिते, ज्ञानदेव साळुंखे, पटेल, धन्वंतरी साळुंखे, प्रिया तारळेकर, रमेश बागल, हेमंत पलंगे, अमर तडाखे अशा एकूण 200 सायकलस्वारांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला व प्रदूषणमुक्त मलकापूरसाठीचा संदेश दिला.
महारॅली ढेबेवाडी फाटा- गणेश कॉलनी- ढेबेवाडी फाटा- संगम हॉटेल- मलकापूर फाटा- लक्ष्मीनगर असा होता. प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेस सायकल रॅली आयोजित करून प्रदूषणमुक्त मलकापूर करणेचा संकल्प मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला. प्रत्येक सायकलस्वाराला सहभागाबद्दल लक्ष्मीनगर येथे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. लक्ष्मीनगर येथील वैकुंठभूमीमध्ये वृक्षलागवड करून वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजेंद्र यादव यांनी आभार मानले.