
दैनिक स्थैर्य | दि. 05 मार्च 2025 | फलटण | शहरातील उमाजी नाईक चौक येथील दगडीचाळ गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक राजाभाऊ शिरतोडे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
फलटण येथील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या “राजभवन” या निवासस्थानी राजाभाऊ शिरतोडे यांनी कार्यकर्त्यांच्यासह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, भाजपा तालुकाध्यक्ष (पश्चिम मंडल) अमोल सस्ते, युवा नेते अमित भोईटे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, माजी नगरसेवक फिरोज आतार, अमोल भोईटे, युवा उद्योजक सागर शहा, लालासाहेब पवार, मेहबूब मेटकरी, श्रीमंत रामराजे युवा मंचचे संस्थापक राहुल निंबाळकर, सस्तेवाडी विकास सोसायटीचे संचालक सुनील सस्ते यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

राजाभाऊ शिरतोडे यांच्या प्रवेशाने प्रभाग क्र. ७ ची गणिते बदलणार
उमाजी नाईक चौक येथील दगडीचाळ गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ शिरतोडे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाने आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. ७ ची गणिते नक्कीच बदलली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहेत. गत महिन्यात प्रभाग क्र. ७ येथील युवा नेते अमोल भोईटे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता आगामी काळात प्रभाग क्र. ७ मध्ये राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा सुरू आहे.