दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२४ | फलटण | तालुक्यातील कापशी येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी संतकृपा उद्योग समूहाचे शिल्पकार विलासराव नलवडे व भाजपा पश्चिम मंडळ अध्यक्ष अमोल सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. कापशी येथील झालेल्या प्रवेशामुळे कापशी गावासह पंचायत समिती गटामध्ये राजे गटाला मोठा धक्का बसला असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील “राजभवन” या निवासस्थानी पक्ष प्रवेश संपन्न करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विकास दादासो खताळ, मंगेश वरपे, तुकाराम काळे, हनुमंत मसुगडे, लखन दडस, महेश वरपे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कापशी येथून विकास सोसायटीचे माजी चेअरमन पोपट कदम, माजी उपसरपंच रमेश बोबडे, बाळासाहेब अडसुळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब खताळ, रामदास भुजबळ, राहुल कदम, रमेश हनुमंत बोबडे, प्रताप हिराचंद बोबडे, अजित पोपट कदम, निखिल दिलीप पवार, हर्षद पोपट कदम, संकेत कुमार भोसले, अंकुश रामचंद्र कदम यांचे पक्ष प्रवेश संपन्न झाले आहेत.