
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : आज, दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे आणि स्वर्गीय लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ध्वजारोहण समारंभास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.
याच कार्यक्रमादरम्यान, ज्येष्ठ नेते बबनराव निकम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.