आमदार अनिल भाऊ बाबर यांची माणुसकी


दैनिक स्थैर्य । दि. ०१ नोव्हेंबर २०२२ । आटपाडी । आमदार अनिलभाऊ बाबर कातर खटाव येथील एक कार्यक्रम आटोपून आज सांयकाळी मायणी वरून विट्याकडे येत असताना त्यांना माहुली गावाजवळ एका दुचाकीचा अपघात झालेला दिसला.

भाऊंनी तात्काळ ड्रायव्हर ना गाडी थांबविण्यास सांगितले आणि उतरून अपघात झालेल्या ठिकाणी गेले. ढवळेश्वर येथील दाम्पत्य आपल्या लहान बाळाला गाडीवर घेऊन विट्याकडे येताना घसरून पडले होते. लहान मुलीला व त्याच्या आईला डोक्याला मार लागलेला होता. अनेक लोक थांबून बघत होते.

भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गाडीमध्ये त्यांना बसवून विट्यातील ओमश्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले व डॉक्टरांना योग्य ते उपचार करण्यास सांगितले


Back to top button
Don`t copy text!