आपल्या सगळ्यांची धडपड मोठे अन् महान बनण्याची सुरू आहे.आपण त्यासाठी जीवाची पर्वा न करता धावत असतो.
संपत्ती आणि स्थिती एखाद्यास तात्पुरते महान बनवते. पण मानवता आणि चांगली नैतिकता माणसाला नेहमीच आदर्श बनविते.
मानवता ही संस्कारात व रक्तात असावी लागते.संतानी मानवतेची पताका फडकविली आहे.मानवता ही सर्व चराचरात व्यापून दिसली पाहिजे. मानवता ही जात धर्म भाषा प्रांत वंश यापलिकडे जाते.मानवता ही आपल्या कृतीतून वृत्तीतून दिसून येते.मानवता ही आपल परकं पाहत नाही.ती सर्वसामावेशक असावी.मानवता मंजे आपल्याकडील जे चांगले उदात्त महान शश्वत वैश्विक ते दुसऱ्यांना द्यावे .तहानलेल्यांना जल , भूकलेल्यांना घास, निराधरांना आधार ही मानवता अंगी बाणवावी.
आपल्या घराण्याची वैभवशाली परंपरा जोपासून आपण या विश्वव्यापक मानवतेची करु.आपणाकडे धनाची गरीबी असावी पण मानवतेची श्रीमंती भरभरुन असल्यावर धनाचा श्रीमंत झुकला पाहिजे. आपणही डोक्यात हवा शिरु न देता कोणत्याच प्रकारचे अवंडबर न माजवता सहज मानवता उभी करुच.आपलं परकं न बघता चराचरातील सर्वांना या मानवतारुपी संपत्तीला हातभार लावल्यास कुबेराचे दातृत्व लाभेल.कोविड काळात आपणाल जमेल तशी गाजावाजा न करता मानवतेची साखळी तयार करु.आपण फक्त निमित्तमात्र बाकी तुमच्या प्रेरणेने हे शक्य होणार.