मानवी जीवन अहंकारामुळे बरबाद होते – राजनकाका देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
मानवी जीवनामध्ये जर एखाद्याला अहंकार आला तर त्याचे जीवन या अहंकारामुळे बरबाद होते, मनात पाप येते, अनेक संकटे येतात. त्यामुळे अहंकार येऊ देऊ नका. सतत वेळ मिळेल तेव्हा भगवंताचे नाम घ्या, त्यांना शरण जावा. आई-वडिलांची सेवा करा. यामुळे परमेश्वराची तुमच्यावर कृपा राहील, असे आवाहन परमपूज्य राजनकाका देशमुख यांनी केले.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्यां पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ, शिवाजी रोड, फलटणच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजनकाका देशमुख बोलत होते. कार्यक्रमास श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष प.पू. सुदामराजबाबा विद्वांस, व्यसनमुक्त संघटनेचे प.पू. धैर्यशीलभाऊ देशमुख, प.पू. नवनाथ महाराज (शेरेचीवाडी) हे उपस्थित होते.

आजच्या आधुनिक काळात माणूस ‘माणूसपण’ विसरत चालला असून परमेश्वराची आराधना करण्यास त्याला वेळ नाही. आई-वडील हे डोक्यावरचे ओझे झाले आहे, असा समज काहींनी करून घेतला असून आई-वडिलांची सेवा म्हणजेच भगवंताची सेवा आहे. आई-वडीलच मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतात. त्यामुळे आई-वडिलांची सेवा करा, त्यांना विसरू नका. त्यांच्या म्हातारपणाची तुम्ही काठी बना, तरच तुमचे जीवन सफल झाले असे म्हणता येईल, असे नवनाथ महाराज यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुदामराजबाबा विद्वांस, धैर्यशीलभाऊ देशमुख यांचेही प्रवचन झाले.

स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ८.०० वाजता श्रींचा अभिषेक, महाआरती झाली. यावेळी मंत्र, नामस्मरण, वास्तूशास्त्र, पितृषास्त्र, संख्याशास्त्र, शिवसरोदय शास्त्र याविषयी प.पू. राजनकाका देशमुख यांचे प्रवचन झाले.


Back to top button
Don`t copy text!