
स्थैर्य, सातारा, दि. 18 डिसेंबर : तपोवनातली झाडे तोडू नयेत, झाडे वाचवली जावीत यासाठी सातार्यातील सामाजिक कार्यकर्त रस्त्यावर उतरून मानवी साखळी करुन शासनाचा निषेध नोंदवत तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
या आंदोलनात माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, शिवाजी जाधव, सोमनाथ देशमुख, अनिल जाधव, गुलाब बनसोडे, अॅड मंगेश महामुलकर, संदीप माने, राजेंद्र राजपुत, राजेंद्र शिंगटे, अर्जुन राठोड, राजेंद्र व्होटकर, महारुद्र तिकुंडे, राजेंद्र गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुनहातात बोर्ड धरुन निषेध नोंदवला.
यावेळी बोलताना सुशांत मोरे म्हणाले, शासनाने साधुग्रामसाठी झाडे तोडण्याचा निर्णय घेतलाआहे तो चुकीचा आहे. शासनाने पर्यायी जागा निवडावी, कोणाचे तरी टेंडरसाठी मलिदा मिळावा, जागा कोणत्या तरी उद्योगपतीच्या पक्षात पालण्याचा डाव आहे. त्यामुळे या प्रकाराचा निषेध करत असून भविष्यात ही झाडे तोडली तर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा दिला आहे. शिवाजी जाधव म्हणाले, दर बारा वर्षानी कुंम मेहाचे आयोजन केले जाते. परंतु यावेळी गालबोट लागले आहे. शेकडो वर्षाची झाडे तोडण्याचे काम सरकारने केले आहे. ती जागा बळकावण्याचा प्रयत्न वाटत आहे, असे मत मांडले. शंकर माळवदे महणाले, कुंभमेळयासाती अक्षरशः झाडांची हत्या केली जात आहे. एक झाड लावायत्ता आणि एक झाड जगवायला किती कष्ट घ्यावे लागतात. तुम्ही ग्लोवल वार्मिंगचे कारण देता, स्वतःहून झाडे तोडतआहात. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशावेळी ही झाडे न तोडता आपण तेथे कुंभमेळा साजरा करु शकतो. झाडे लावा असे सांगत असता, पाचा हजार कोटी झाडाचे उद्दीष्ठ देता आणि तुम्हीच झाडे तोडता. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की सरकारने झाडे न तोडता कुंभमेळा साजरा करावा, अशी विनंती केली आहे. तसेच महारुद्र तिकुंडे म्हणाले, राज्य शासनाचा निषेध करतो. सरकार कोटयवधी रुपये खर्च करते. सरकार परवानगी न घेता काम करते. सरकारने गांभीर्य न घेता 1200 झाडे आतापर्यंत तोडली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. जी प्लॉन बनवला आहे तो झाडांना गृहीत धरुन बनवावा, झाडे तोडणार्यांना जनता धडा शिकवेल, असा इशारा दिला आहे.

