माजी आमदार दीपक चव्हाणांच्या तरडगावात रणजितदादांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश


राजे गटाचे नेते आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांचे होमग्राऊंड असलेल्या तरडगावमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील शेकडो युवकांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

स्थैर्य, तरडगाव, दि. 03 जानेवारी : फलटण तालुक्यातील राजकारणात ज्या तरडगावला ‘राजे गटा’चा आणि विशेषतः माजी आमदार दीपक चव्हाण यांचा अभेद्य बालेकिल्ला मानले जात होते, त्या बालेकिल्ल्यालाच आज मोठा सुरुंग लागला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासकामांवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत तरडगाव येथील शेकडो युवकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. विरोधकांच्या होमग्राऊंडवर जाऊन रणजितसिंह यांनी हा राजकीय ‘धक्का’ दिल्याने आगामी निवडणुकांचे गणित बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार दीपक चव्हाण यांचे गाव म्हणून तरडगावची ओळख आहे. मात्र, गेल्या काही काळापासून येथील तरुण वर्ग विकासाच्या मुद्द्यावरून अस्वस्थ होता. या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी युवकांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला असून, यामुळे गावात भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.

यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

यावेळी तरडगावमधील खालील प्रमुख युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला: सुनिल अडसूळ, अनिल अडसूळ, मयुर अडसूळ, दिपक अडसूळ, अक्षय अडसूळ, साहिल अडसूळ, संकेत अडसूळ, प्रदिप अडसूळ, प्रसाद अडसूळ, प्रशांत अडसूळ, प्रमोद अडसूळ, राहुल अडसूळ, अभिजीत अडसूळ, शुभम अडसूळ, अशोक अडसूळ, वैभव अडसूळ, योगेश अडसूळ, निलेश अडसूळ, प्रकाश खामणे, सनी मदने, सुजित अडसूळ, प्रविण अडसूळ, पंकज अडसूळ, सुरेश मानसिंग अडसूळ, पुंडलिक अडसूळ, दशरथ अडसूळ, सागर अडसूळ, मनोज अडसूळ, शिवाजी खामणे, संदिप अडसूळ, ओंकार अडसूळ, ओंकार संतोष अडसूळ, प्रणित अडसूळ, सचिन अडसूळ आणि सचिन जाधव.

या प्रवेशानंतर बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “तरडगावातील युवकांनी घेतलेला हा निर्णय परिवर्तनाची नांदी आहे. केवळ सत्तेसाठी राजकारण न करता, विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या युवकांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील.” या राजकीय भूकंपामुळे राजे गटात मोठी अस्वस्थता पसरली असून, तरडगावात आता ‘निंबाळकर गट’ सक्रिय झाल्याने स्थानिक राजकारणात चुरस निर्माण झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!