
दैनिक स्थैर्य । 01 मे 2025। उपळवे । सोपानराव जाधव । उपळवे गावामध्ये धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या मानाने गावच्या पुढाकाराने सुरू करण्यात येणाऱ्या अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी उपळवे गावचा पाहुणा म्हणून नव्हे तर महाराष्ट्र सरकारचा मंत्री या नात्याने अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकासाठी भरगच्च निधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार असल्याचे मत क्रीडा मंत्री ना. दत्ता (मामा) भरणे यांनी व्यक्त केले.
उपळवे येथे यात्रेच्या निमित्त दिलेल्या भेट प्रसंगी क्रीडा मंत्री ना. दत्ता (मामा) भरणे बोलत होते. यावेळी उपळवे ग्रामस्थांच्यावतीने यथोचित सन्मान करण्यात आला आहे.
याप्रसंगी उपळवे गावचे सरपंच विक्रम गोरख लंबाते, उपसरपंच शेखर सुभाषराव लंबाते, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत लंबाते, माजी सरपंच सोपानराव जाधव, हनुमंतराव जगताप, माजी पोलीस उपनिरीक्षक सुरेशराव लंबाते, ग्रामपंचायत सदस्य खंडेराव मदने, रोहन लंबाते, अजित लंबाते, अनिल लंबाते, हनुमंतराव लंबाते, तसेच उपळवे गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपळवे ग्रामपंचायतच्या वतीने गावचे सरपंच, उपसरपंच पदाधिकारी यांनी क्रीडा मंत्री ना. दत्ता (मामा) भरणे यांचा सत्कार करण्यात आला.
क्रीडा मंत्री ना. दत्ता (मामा) भरणे हे उपळवे गावचे सुरेशराव लंबाते यांचे व्याही पावणे म्हणून गेली वर्षभर त्यांचा नेहमी उपळवे गावाशी संपर्क आहे.