बरड जिल्हा परिषद गटासाठी भरघोस विकास निधी मंजूर; संतोष गावडे-पाटील यांच्याकडून रणजितदादा व सचिन पाटील यांचे आभार


राज्याच्या अर्थसंकल्पात फलटण तालुक्यातील बरड जिल्हा परिषद गटासाठी तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. याबद्दल भाजपचे प्रदेश सदस्य संतोष गावडे-पाटील यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे आभार मानले आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. 12 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फलटण तालुक्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी भरगच्च असा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामध्ये बरड जिल्हा परिषद गटासाठी तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा घसघशीत निधी मंजूर करण्यात आला आहे. या भरघोस निधीबद्दल बरड जिल्हा परिषद गटातील जनतेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य संतोष गावडे-पाटील यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर व स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध : संतोष गावडे-पाटील

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याच्या विशेषतः बरड जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी सुमारे ३ कोटींचा (३ कोटी २० लाख) निधी मंजूर केल्याबद्दल बरड गटातील नागरिकांच्या वतीने संतोष गावडे-पाटील यांनी या सर्व नेत्यांचे विशेष अभिनंदन करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बरड जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

मंजूर करण्यात आलेला विकास निधी आणि रस्ते

मंजूर करण्यात आलेल्या या कोट्यवधींच्या निधीतून गटातील अनेक महत्त्वपूर्ण रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गिरवी ते दुधेबावी या रस्त्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये आणि कुरवली-बरड-गुणवरे या रस्त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच पवारवाडी-मुंजवडी-राजुरी-कुरवली-आंदरूड-जावली या महत्त्वपूर्ण रस्त्यासाठी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, या सर्व कामांमुळे बरड जिल्हा परिषद गटातील दळणवळणाचा प्रश्न सुटून परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.


Back to top button
Don`t copy text!