माजी उपनगराध्यक्षांना नगरपालिकेची आताच आठवण कशी झाली : भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष नितीन जगताप


दैनिक स्थैर्य । दि. २९ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले यांना फलटण नगरपरिषदेची आताच आठवण कशी झाली ? हा मोठा प्रश्न सध्या फलटणकरांच्या समोर उभा राहिला आहे. गेली दहा वर्षे आम्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण नगरपरिषदेमध्ये सत्ताधारी मंडळींच्या विरोधात आवाज उठवत आहोत. आपली कारकीर्द संपल्यानंतर गायब झालेल्या उपनगराध्यक्ष यांना नगरपालिकेची आताच आठवण कशी झाली ? आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता कोणाची येणार आहे, याचे उत्तर काळाच्या पोटामध्ये दडले आहे. भकास फलटण करणार्यांनी निवडणूक आल्यावरच शहरासाठी कळवळा आहे असे दाखवू नये, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे फलटण शहर उपाध्यक्ष नितीन जगताप यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!