पुणे महानगरपालिकेचा कचरा साताऱ्यात आणला जातोच कसा?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 15 : अगोदरच साताऱ्याचा बायोमायनिंग प्रकल्पच अपूर्ण अवस्थेत आहे. नेचर नीड या संस्थेकडे मेडिकल वेस्ट कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे. परंतु सध्याच्या करोनाच्या काळात पुणे महानगरपालिकेचा कचरा साताऱ्यात आणला जातोच कसा?, सातारकरांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असून त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सातारा शहरात अगोदरच बायोमेडिकल वेस्ट गोळा केले जाते आणि ते कचरा डेपोत कसेही टाकले जाते त्यावर पालिकेकडून कोणतेही निर्बंध ठेवले जात नाहीत. असे असताना सध्या करोनाच्या काळात चांगलाच सातारा शहर थोडेसे करोना पासून बाजूला असताना पुण्यात करोनाचा कहर सुरु आहेत. तेथील महानगपालिका क्षेत्रातून जवळपास असणाऱ्या पिंपरी महानगरपालिका असेल बारामती नगरपालिका असेल या नगरपालिका क्षेत्रात बायोमायनिंग प्रोजेक्ट आहेत. तरीसुद्दा साताऱ्याकडे पुणे नगरपालिकेच्या हद्दीतील मेडिकल वेस्ट आलेच कसे?, मेडिकल वेस्ट डिस्पोज करण्यासाठी प्रत्येक किलोमागे सव्वाशे रुपये भेटतात असे सांगण्यात येते. त्यामुळे सातारकरांच्या जीवाशी खेळून कचरा सोनगाव कचरा डेपोत कसा काय?, पालिकेने त्यावर का चाप लावला नाही. विद्यमान आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनाही या घटनेची काहीच माहिती नाही. त्यांना या बाबी घडत असताना अंधारात ठेवले जात आहे काय?, असे अनेक प्रश्न साताकर विचारु लागले आहेत.

तो पुण्यातला सातारच्या कचरा डेपोत येतो. सर्वसामान्य कष्टकरी वर्गच कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम करतो. तो कचरा कोणत्या रुग्णाचा आहे हे समजत नाही. कचरा डेपोत काम करणारा कर्मचारी साताऱ्यात फिरणार मग सातारा शहरातल्या नागरिकांना त्रास होणार. यंत्रणा पुण्यातून आजार मागवण्याचे काम करते. ते थांबवावे, अशी प्रतिक्रिया सर्व श्रमिक कचरा वेचक संघाचे प्रकाश भिसे यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!