भारतामध्ये कॅज्युअल गेमिंग कसा बनला एनएफटी गेमिंग बिझनेस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । आज मात्र एनएफटी (NFTs) आणि ब्लॉकचेन्सनी गेमिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन पार बदलून टाकला आहे.आज एखाद्या व्यवसायाचे गांभीर्य हे त्यातून उदरनिर्वाहाच्या मिळणाऱ्या शाश्वतीवर अवलंबून असते. कदाचित म्हणूनच साधारण पंधराएक वर्षांपूर्वी ज्या व्यवसायांना फारसे गंभीर मानले जात नव्हते त्यांना आज बऱ्यापैकी गांभीर्य प्राप्त झाले आहे..जसे की यूट्यूबर बनणे किंवा ब्लॉगर बनणे.

या ‘अॅक्टिव्हिटीज’ना व्यवसायाचे रूप नेमक्या कोणत्या घटकांमुळे मिळाले? तर या मंचांची सहज उपलब्धता आणि त्यांचा खुलेपणा या गोष्टी त्यासाठी कारणीभूत ठरल्याचे दिसते. नेमकेपणाने सांगायचे या उपक्रमांमधून पैसा मिळविणे हे लोकशाहीच्या तत्वाला खूपच धरून आहे आणि याचे सारे श्रेय ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि तंत्रज्ञानाचा झालेला विकास यांना जात असल्याचे गार्डियनलिंकचे सीईओ आणि सह-संस्थापक रामकुमार सुब्रमण्यम यांनी सांगितले.

ते सांगतात गेमिंग सध्या आपल्या किशोरावस्थेमधून जात आहे. एनएफटीजनी गेमिंग असेट्सना त्यांच्या बाजारपेठेतील दीर्घआयुर्मनामुळे (longevity) आणि व्यापारक्षमतेमुळे अधिक पात्र बनवले आहे. पी२इने लोकांसाठी फक्त गेम्स खेळण्याचीच नव्हे तर आपला वेळ, पैसा आणि कसब खर्च करून पैसे कमावण्याची संधीही मिळवून दिली आहे. थोडक्यात सांगायचे झाले, गेल्या दशकामध्ये जसे कन्टेन्ट क्रिएशनने स्वत:चे रूपडे बदलून टाकले आहे, त्याचप्रमाणे आता आपले गेमिंग कौशल्य वापरून पैस कमावणेही शक्य झाले आहे.

ही गोष्ट गेमिंग जगतासाठी नवीन आहे तशीच ती अर्थार्जनाच्या आणि करिअरच्या जगासाठीही नवीन आहे. फिलिपाइन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि कम्बोडायासारख्या देशांतील लोकांना फक्त पी२इ गेम्स खेळून चरितार्थ चालविताना आपण पाहिले आहे. पण ते गेम्स भारतातील बहुतांश लोकसंख्येच्या दृष्टीने बऱ्यापैकी विचित्र होते.

आता मात्र क्रिकेटसारखे खेळ एनएफटीच्या क्षेत्रामध्ये येऊ लागल्याने आणि त्यांना पी२इ खेळांचे रूप मिळू लागल्याने सर्वसामान्य भारतीयांसाठी एनएफटीज मध्ये गुंतवणूक करणे आणि त्यातून अर्थार्जन करणे अधिक सोपे बनले आहे व हा पर्याय त्यांना अधिक स्वागतशील वाटू लागला आहे. बऱ्याचशा गेम्समध्ये गेमिंग असेट्सना एनएफटीज म्हणून सादर केले जाते, याचा अर्थ बाजारपेठेत त्यांचा व्यापार करता येऊ शकतो. त्यामुळे कोणताही एनएफटी गुंतवणूकदार गेम खेळत असला तरीही त्यांना त्या एनएफटीजचा बाजारपेठेत सौदा करून फायदा कमावता येऊ शकेल.

बऱ्याच गेम्समध्ये एनएफटीजना भाड्याने देण्यासारखे अभिनव पर्यायही लवकरच आणले जाणार आहेत. यामुळे एनएफटी यूजर आणि एनएफटीचे मालक यांच्यातील सीमारेषा पुसली जाईल व त्यामुळे गेमिंगच्या चाहत्यांना अधिक गंभीर किंवा असे म्हणता येईल की अधिक मोबदला देणाऱ्या गेमिंगची दारे खुली होऊ शकतील.

हे परिवर्तन खूपच गरजेचे होते आणि ब्लॉकचेनसारखे संपूर्णपणे विकेंद्रित आणि डिस्ट्रिब्युटेड लेजर या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी असावे हे अगदी स्वाभाविक आहे. जेव्हा असे गेम्स एक संपूर्णपणे विकेंद्रित, स्वायत्त संस्था बनतात, तेव्हा समुदायच त्या गेमला तगविण्याची काळजी घेतो, त्यासाठी कोणत्याही मध्यवर्ती संस्थेवर अवलूंबन राहण्याची गरज राहत नाही. गेमची सूत्रे नियंत्रित करण्यासाठी कोणतीही केंद्रीय संस्था नसेल तेव्हा त्या गेमची सर्व अंगांनी भरभराट होईल आणि असे गेम्स खेळून अर्थार्जन करणाऱ्या लोकांची संख्याही वाढेल.


Back to top button
Don`t copy text!