कोविड नियमांचा भंग केल्याप्रकरणी हॉटेल मालकाला 25 हजारांचा दंड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ५ जुलै २०२१ । शिरवळ । शिरवळ येथील एका हॉटेलमध्ये सुरू विनापरवानगी लग्न समारंभ आयोजि केल्याप्रकरणी 25 हजारांचा हॉटेल व्यवस्थापनाला करण्यात आला आहे. तसेच लग्न समारंभ असणार्‍या कुंटुंबियांना दंड भरण्याची नोटीस बजावला.

याबाबतची माहिती अशी कि, शिरवळ, ता. खंडाळा याठिकाणी पळशी, ता. खंडाळा येथील एका कुटुंबियांचे लग्न समारंभ प्रशासनाची परवानगी न घेता विनापरवानगी सुरू असल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार मधुकर कुंभार हे संबंधित हॉटेलमधील हॉलमध्ये गेले असता त्याठिकाणी विनापरवानगी लग्न समारंभ सुरु असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांनी तत्काळ याबाबतची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांना दिली असता पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले. यावेळी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचा भंग करीत व कोरोना विषयक दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला 25 हजार रुपये दंड भरण्याची सूचना पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांनी हॉटेल व्यवस्थापनाला करताच संबंधित हॉटेल व्यवस्थापनाने शिरवळ ग्रामपंचायत प्रतिनिधीकडे 25 हजार रुपयांचा दंड भरला. यावेळी लग्न समारंभ असणार्‍या कुंटुंबियाला पोलीस हवालदार मधुकर कुंभार यांनी दंड भारण्याबाबतची नोटीस बजावली.


Back to top button
Don`t copy text!