
दैनिक स्थैर्य । फलटण । फलटण तालुक्यातील नव्याने सुरु झालेले, हॉटेल सेलिब्रेशन प्युअर व्हेज हे रूफटॉप रेस्टॉरंट फलटणकरांसाठी खुले झाले आहे. हे फलटणमधील पहिले रूफटॉप शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट आहे जे विविध प्रकारच्या चवदार पदार्थांसह पाचव्या मजल्यावर रिंग रोडच्या रॉयल क्रॉउन बिल्डिंगमध्ये स्थित आहे. हे रेस्टॉरंट सकाळी ८ वाजल्यापासून नाश्ता, जेवण, चाट, चायनीज आणि कॉन्टिनेंटल खाद्यपदार्थांसह रात्रीपर्यंत सेवा पुरवते.
हॉटेल सेलिब्रेशन प्युअर व्हेजची सर्वात मोठी विशेषता म्हणजे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ आणि उत्कृष्ट साऊथ इंडियन खाद्य सेवा. यातील नाष्ट्यामध्ये महाराष्ट्राचे पारंपारिक पदार्थ उपलब्ध असतील.
त्याचबरोबर पुल साईड रेस्टॉरंट म्हणून हे ठिकाण फलटणमधील एकमेव आणि विशेष असलेले ठिकाण आहे.
हॉटेल सेलिब्रेशनमध्ये एका बान्केट हॉलसह विविध सुविधा दिल्या आहेत. यामध्ये हॉल मध्ये महत्वाच्या असणाऱ्या प्रोजेक्टर, माईक सिस्टीम, साउंड सिस्टीम, स्टेज अश्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.
एका सुंदर स्विमिंग पूलसह सर्व प्रकारच्या छोट्या, मोठ्या समारंभांसाठी हे रेस्टॉरंट आदर्श आहे. डिनर प्लॅन करतेवेळी छोट्या मोठ्या ग्रुपसाठी विशेष सेवा देण्याचा मानस हॉटेल व्यवस्थापनाचा आहे.
हॉटेल सेलिब्रेशन प्युअर व्हेज मुख्य रूपाने शाकाहारी फुडचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांना एक उत्कृष्ट पर्याय देत आहे, आणि त्याचबरोबर फलटण येथील सांस्कृतिक वारशाला समृद्ध करत आहे.
या नवीन रेस्टॉरंटच्या सुरुवातीने फलटणमधील खाद्यप्रेमींना एका वेगळ्याच अनुभवाची संधी मिळाली आहे.
तुम्हाला जर हॉटेलबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल किंवा हॉटेलमध्ये ऍडव्हान्स बुकिंग करायचे असेल तर 9096962854, 9421180201 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.